Elec-widget

अरेरे...आजोबांच्या पुण्यतिथीसाठी आलेल्या नातवाचा अपघातात मृत्यू

अरेरे...आजोबांच्या पुण्यतिथीसाठी आलेल्या नातवाचा अपघातात मृत्यू

नागपुरहून निघण्याच्या आधी राहुलने आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून बातचीतही केली होती. काही तासांमध्येच मी येतो असं त्याने त्याच्या आईशी बोलताना म्हटलं होतं.

  • Share this:

प्रविण तांडेकर, भंडारा 30 नोव्हेंबर: आजोबांच्या पुण्यतिथीसाठी गावी आलेल्या एका नातवाचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आजोबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या नातवाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येतेय. हा नातू गुजरातहून आपल्या गावी आला होता. या 23 वर्षीय तरुणाचा बाईक आणि कारच्या अपघातात मृत्यू झाला राहुल सुखदेव भेंडारकर असं त्याचं नाव असून या अपघातातील कार चालकाला अटक करण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील साखरा या गावातील राहणारा राहुल भेंडारकर हा तरुण नोकरी निमित्त गुजरातला होता शनिवारी त्याच्या आजोबांची पुण्यतिथी असल्याने तो त्याच्या मूळ गाव साखरा इथं जात होता. गुजरात वरून तो ट्रेनने नागपूर येथे आपल्या भावाकडे पोहोचला आणि तिथून भावाची दुचाकी घेऊन लाखांदूर कडे निघाला होता.

छत्रपती शिवराय, आई-वडिलांची शपथ घेणं गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन'

साकोली ते लाखांदूर मार्गावर शिवनीबांध या रस्त्यावर सानगडी वरून साकोली कडे जाणाऱ्या इंडिका कारने राहुलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा जोरदार होता की राहुल सुखदेव भंडारकर याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळताच घटनास्थळी पोचल्यावर तरुण मुलाच्या जाण्यामुळे राहुलच्या आईने आणि त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.आजोबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी तरुण नातवाचा मृत्यू झाल्यामुळे साखरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उद्धव ठाकरेंनी विश्वासाचा ठराव जिंकल्यावर अमित शहांची मुंबईत एण्ट्री

या आपघाताची पोलिसांनी चौकशी सुरू केलीय. नेमकी चूक कुणाची आहे. अपघाताचं कारण काय आहे हे पोलीस शोधून काढत आहे. नागपुरहून निघण्याच्या आधी राहुलने आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून बातचीतही केली होती. काही तासांमध्येच मी येतो असं त्याने त्याच्या आईशी बोलताना म्हटलं होतं. आपल्या मुलाची प्रतिक्षा करत असलेल्या आईला त्याच्या मृत्यूचीच बातमी ऐकावी लागल्याने त्यांना धक्का बसलाय.

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2019 04:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...