परीक्षेच्या काळात मशिदीवरचे लाऊड स्पीकर बंद करा, शिवसेना नेत्याचं गृहमंत्र्यांना पत्र

परीक्षेच्या काळात मशिदीवरचे लाऊड स्पीकर बंद करा, शिवसेना नेत्याचं गृहमंत्र्यांना पत्र

विरोधी पक्षात असताना शिवसेनेने या आधी अनेकदा अशा प्रकारची भूमिका मांडली होती. शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिकाही मांडली होती.

  • Share this:

प्रशांत मोहिते, नागपूर 21 फेब्रुवारी : परीक्षेच्या काळात मिशिदीवरचे लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात अशी मागणी शिवसेनेच्या युवा नेत्याने केलीय. नागपूर जिल्ह्याचे युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांनी ही मागणी केलीय. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय. त्यात ही मागणी करण्यात आलीय. परीक्षेचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे दिवस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय. परीक्षेच्या काळात कुटुंबांमध्ये टी.व्ही. आणि रेडिओही बंद ठेवतात. असं असताना दिवसातून पाच वेळा नमाज पठण केलं जातं. त्यामुळे त्याच्या आवाजाने विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात हे लाऊड स्पिकर्स बंद ठेवण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय.

शिवसेनेच्या युवा नेत्याच्या या मागणीमुळे वाद होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत शिवसेना नेत्यांनी अशी भूमिका घेणं यात काही वेगळं समजलं जात नव्हतं. मात्र राज्यात महाआघाडीचं सरकार आल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना या मागणीचं निवदेन दिलंय.

विरोधी पक्षात असताना शिवसेनेने या आधी अनेकदा अशा प्रकारची भूमिका मांडली होती. शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिकाही मांडली होती. राज्यात त्यावर वादही झाले होते. मात्र आता असे वादाचे विषय टाळण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार तयार केल्याने शिवसेनेची आक्रमक भूमिका मवाळ झालीय असं बोललं जातं. त्यामुळे शिवसेना यावर काय अधिकृत भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shiv sena
First Published: Feb 21, 2020 01:37 PM IST

ताज्या बातम्या