'पत्नीकडून पैसे मागणे म्हणजे तिचा छळ नाही'; महिलेच्या आत्महत्येनंतर पतीची कोर्टाकडून सुटका

'पत्नीकडून पैसे मागणे म्हणजे तिचा छळ नाही'; महिलेच्या आत्महत्येनंतर पतीची कोर्टाकडून सुटका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचने हा निर्णय दिला आहे

  • Share this:

नागपुर, 31 जानेवारी : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचने निर्णय देत सांगितलं की, पत्नीकडून पैसे मागणे यात छळ वा अत्याचार करण्याच्या श्रेणीमध्ये ठेवता येऊ शकत नाही. या निर्णयासोबतच कोर्टाने लग्नाच्या 9 वर्षांनंतर पत्नीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप असलेल्या पतीची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी याचिकाकर्ता प्रशांत जारे यांची सुटका करण्याची अपील मंजूर केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, हे प्रकरण पती आणि पत्नीमधील वादाशी संबंधित आहे. येथे पती पैशांसाठी पत्नीला मारहाण करीत होता. पत्नीकडून पैशांची मागणी करण्याच्या प्रकाराला कलम 498 अ अंतर्गत अत्याचाराच्या श्रेणीत दाखल केले जाऊ शकत नाही. न्यायाधीशांनी सांगितलं की, आरोपी आपल्या पत्नीला सोडू इच्छित नाही, तर त्याला तिची सोबत हवी होती. वाद झाल्यानंतर तो तिला तिच्या वडिलांच्या घरुन नेण्यासाठी जात होती. तो तिला रुग्णालयातही घेऊ जात होता आणि अंत्य संस्कारासाठी मृतदेह वडिलांना देण्यास नकार दिला होता. न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी नुकतीच अल्पवयीन मुलीला स्किन टू स्किन संपर्काबाबत निर्णय दिला होता. त्याचीही मोठी चर्चा झाली होती.

हे ही वाचा-नसबंदीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार; महिलेच्या नातेवाईकांनी घातला गोंधळ

दाम्पत्याचं लग्न 1995 मध्ये झालं होतं. 12 नोव्हेंबर 2004 मध्ये पत्नीने आत्महत्या केली होती. मृत महिलेच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल करीत हुंड्याच्या हव्यासापोटी पती महिलेवर अत्याचार करीत असल्याचा आरोप केला होता. यवतमाळ सत्र न्यायालयाने 2008 मध्ये आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि अत्याचार केल्याच्या आरोपाखाली 4 वर्षांची शिक्षा दिली होती. आरोपीने नुकतेच याला कोर्टात आव्हान दिलं होतं.

Published by: Meenal Gangurde
First published: January 31, 2021, 3:21 PM IST

ताज्या बातम्या