Home /News /maharashtra /

भरधाव ट्रकने दिली पोलिसाला धडक, भीषण अपघातात जागीच मृत्यू

भरधाव ट्रकने दिली पोलिसाला धडक, भीषण अपघातात जागीच मृत्यू

पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अमरावती, 3 सप्टेंबर : सहकारी पोलीस कर्मचाऱ्याच्या सोबत रोडवर पेट्रोलिंग करत असताना अमरावती पोलीस आयुक्तलयाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ट्रकने धडक दिली आहे. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बडनेरा लोणी नजीक साई हॉटेल जवळ घडली. गोपाल इंगळे असं मृतक पोलिसाचं नाव आहे. सदर पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभा असताना त्यांना मागून येणाऱ्या जि.जे. 19 एक्स 3670 या ट्रकच्या चालकाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात गोपाल इंगळे हे गंभीर जखमी होऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. मात्र उपस्थित पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक ताब्यात घेतला. तसंच ट्रक चालकास अटक करण्यात आली. तर मृतक पोलिसाचा मृतदेह अमरावती जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करिता ठेवण्यात आला आहे. मात्र आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली असून सर्वत्र शोककळा पसरली. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांसाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र नंतरच्या काळात लॉकडाऊनचे नियम शिथिल केले आणि नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सूट देण्यात आली. मात्र त्यानंतर परत एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि पुन्हा काही भागात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. पुन्हा लॉकडाऊन करत निर्बंध कडक करण्यात आल्याने पोलिसांना रस्त्यावर उतरत याची अंमलबजावणी करावी लागत आहे. अशातच पेट्रोलिंग करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amravati

पुढील बातम्या