शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बोगस शिक्षकांनी मतदान केल्याचा आरोप

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बोगस शिक्षकांनी मतदान केल्याचा आरोप

  • Share this:

अमरावती, 26 डिसेंबर: अमरावती शिक्षक मतदारसंघात (Amaravati teacher constituency) 1 डिसेंबर रोजी झालेल्या विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad) एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत पात्र नसलेल्या शिक्षकांनी मतदान (bogus teachers voting) केल्याचा आरोप होत आहे.

सुमारे 5000 बोगस मतदारांनी या निवडणुकीत बनावट व बोगस मतदान मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याचा आरोप शिक्षक मतदार संघाचे पराभूत उमेदवार व शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी केला आहे. शेखर भोयर यांनी याप्रकरणी कोर्टात धाव घेतली आहे.

हेही वाचा..तुला नांदायचं नाही का? म्हणत झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीनं केले सपासप वार

शिक्षक मतदार संघात पार पडलेली ही निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केला आहे. नागपूर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिक्षक मतदारसंघाची नव्याने निवडणूक घेण्याची मागणी शेखर भोयर यांनी केली आहे.

शेखर भोयर यांनी या संदर्भातील त्यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत ही वस्तूस्थिती मांडली. या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या आदेशाला हरताळ फासून काहींनी बोगस शिक्षक मतदार तयार करून आपला विजय मिळवला. याची चौकशी करून ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारा नागपूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे

अपक्ष उमेदवारनं खेचून आणली विजयश्री..

दरम्यान, अमरावमती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी विजयश्री खेचून आखली. किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव करून 3242 मतांनी विजय मिळवला. किरण सरनाईक यांना 12,433 मतं मिळाली होती तर श्रीकांत देशपांडे यांना 9191 मतं मिळाली होती.

हेही वाचा..मुंबईकरांना दिलासा, 'या' उपनगरातून कोरोना हद्दपार! 24 तासांत एकही नवा रुग्ण नाही

महाविकास आघाडीला मोठं यश...

राज्यात नुसत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी तर विजयाची हॅटट्रिक केली. पुणे पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी दणदणीत विजय मिळवला. नागपूर पदवीधर विधानपरीषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी झाले.

Published by: Sandip Parolekar
First published: December 26, 2020, 8:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या