...आणि आमदाराने डोक्यावर जोडे नेत कार्यकर्त्याला घातली चप्पल, 14 वर्षानंतर नवस पूर्ण

...आणि आमदाराने डोक्यावर जोडे नेत कार्यकर्त्याला घातली चप्पल, 14 वर्षानंतर नवस पूर्ण

आमदार झाल्यानंतर त्या आमदाराने डोक्यावर जोडे नेत त्या कार्यकर्त्याचे पाय धुतले आणि त्याच्या पायात चप्पल घातली. 14 वर्षानंतर त्या निष्ठावान कार्यकर्त्याचा नवस पूर्ण झाला.

  • Share this:

अमोल गावंडे, बुलडाणा 7 नोव्हेंबर : आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते काय करतील याचा नेम नाही. आपला नेता आमदार व्हावा म्हणून एका कार्यकर्त्याने चक्क 14 वर्ष पायात चप्पलच घातली नाही. हा नेता 2019 च्या निवडणुकीत आमदार झाला आणि त्या आमदाराने डोक्यावर जोडे नेत त्या कार्यकर्त्याचे पाय धुतले आणि त्याच्या पायात चप्पल घातली. नवस करणारा हा कार्यकर्ता आहे अनिल पवार आणि नवनिर्वाचित आमदार आहेत बुलडाण्याचे नवनिर्वाचित आमदार संजय गायकवाड. गायकवाडांच्या या कृतीने अनिल पवार भारावून गेले आहेत. आपल्या कार्यकर्त्यासाठी डोक्यावर चप्पल घेऊन जाणाऱ्या या आमदाराच्या कृतीचंही कौतुक होतंय.

सत्तासंघर्ष निर्णायक टप्प्यात, आता महाराष्ट्राचं लक्ष पवारांच्या भूमिकेवर

बुलडाणा मतदार संघातील एका कार्यकर्त्याला आपल्या नेत्याचा पराजय एव्हढा जिव्हारी लागला की त्याने प्रणच घेतला होता. जो पर्यंत भाऊ आमदार होत नाहीत तो पर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. आता तब्बल14 वर्षानंतर त्या कार्यकर्त्याचा नेता आमदार झाला आणि त्या कार्यकर्त्याचा नवस पूर्ण झाला. अनिल शंकर पवार हे बुलडाण्याच्या नेहरूनगरमध्ये राहतात. अनिल हे शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते. 2004 च्या निवडणुकीत संजय गायकवाड यांचा पराभव झाला हा पराभव अनिल पवार यांच्या जिव्हारी लागला.

संजय गायकवाड हे आमदार होत नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाही असं त्याने निश्च केला. तेव्हापासून ते अनवाणी पायाने फिरत होते. संजय गायकवाड यांनी त्यांना बऱ्याचदा समजावून सांगितलं पण अनिल यांनी काही आपला निश्चय बदलला नाही. शेवटी 2019 च्या निवडणुकीत संजय गायकवाड यांना शिवसेनेने तिकीट दिलं आणि ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्याचा मान राखत त्याची इच्छा सन्मानाने पूर्ण केली.

'शिवसेनेकडे भाजपला पर्याय उपलब्ध', संजय राऊतांचा खळबळजनक दावा आणि 25 ठळक मुद्दे

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेने कडून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी होताच संजय गायकवाड यांनी नेहरूनगर गाठलं. डोक्यावर नवीन चप्पल घेत अनिल पवार यांना एका खुर्चीवर बसवत त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायात नवीन आणलेली चप्पल घातली. त्यावेळी गेल्या 14 वर्षातील दोघांच्याही संघर्षाचा पट उपस्थितांच्या डोळ्यासमोर तरळून गेला. जमलेलं गाव व शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच भाऊक झाले होते.

Tags:
First Published: Nov 7, 2019 05:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading