Lockdown जेलमध्ये कैद्यांनी पिकवलेला भाजीपाला भरतोय भुकेल्यांचं पोट

Lockdown जेलमध्ये कैद्यांनी पिकवलेला भाजीपाला भरतोय भुकेल्यांचं पोट

अकोला कारागृहाकडे 14 एकर जमीन आहे. तिथे आत्तापर्यंत 71 हजार 907 किलो भाजीपाल्याचं उत्पन्न घेतले आहे.

  • Share this:

अकोला 07 एप्रिल : ,   कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. या संचारबंदीच्या काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्या साऱ्यांना जेवण देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरु आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी परिश्रमाने पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे. या व अशा विविध घटकांची सांगड घालून जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचा उत्तम परिपाठ घालून दिला आहे.

जिल्ह्यात सध्या 25 हून अधिक आश्रयगृहे तर तितकीच कम्युनिटी किचन्स सुरु आहेत. त्यांना दररोज किमान 15 ते 20 हजार लोकांना अन्न द्यावे लागते. त्यासाठी भाजीपाला अन्न धान्य उपलब्ध करावे लागते. त्यासाठी महसूल विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग असे विविध विभाग मिळून काम करीत असतात. या ठिकाणी लागणारी भाजीपाल्याची गरज ओळखून कारागृह अधिक्षक ए.एस. सदाफुले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विनंती केली व बंदीजनांनी पिकवलेला हा भाजीपाला शासकीय दराने कम्युनिटी किचनसाठी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार हा भाजीपाला आता कम्युनिटी किचनला दिला जातोय.

अकोला कारागृहाकडे 14 एकर जमीन आहे. ही जमीन तीन विहीरींच्या पाण्यामुळे ओलिताखाली आहे. परिश्रम करणारे बंदीजन, व्यवस्थापन करणारा कारागृह कर्मचारी वर्ग यांच्यामुळे इथं शेती पिकवली जाते. इथं गहू, सोयाबीन, तूर यासारखी धान्ये कडधान्ये, मोहरी सारखे गळीत धान्य, शिवाय बीट, नवलकोल, आंबटचुका, कढीपत्ता, कोथिंबीर,  मुळा, कांदा, टोमॅटो,  फ्लॉवर, पत्ताकोबी, गोल भोपळा, दुधी भोपळा, पालक, वांगे, भेंडी,  असा अनेक प्रकारचा भाजीपाला पिकवला जातो.

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या भारतीय डॉक्टरांना चीनचे PPE सूट, 1.70 लाख किट मिळाले

याशिवाय इथं असलेले सहा बैल, सहा गायी, पाच वासरे यांना लागणारा चाराही पिकवला जातो. शिवाय जनावरांचे शेणखत. त्यातून सेंद्रिय पद्धतीने हा सर्व भाजीपाला तयार केला जातोय. सध्या या तुरुंगात 402 कैदी आहेत. या शेतीतून तुरुंग प्रशासनाने आतापर्यंत 71 हजार 907 किलो भाजीपाल्याचं उत्पन्न घेतले असून त्याचा बाजार भाव हा 7 लाख  24 हजार 541 रुपये एवढा आहे.

कोरोना मृत्यूमध्ये 60 टक्के लोक 61वर्षांच्या वरचे, डायबेटीस, ब्लडप्रेशर धोक्याचं

हे मार्च अखेरचे उत्पादन आहे. हा भाजीपाला विक्री करतांना तो शासकीय दराने विकला जातो. हा दर बाजारभावापेक्षा निश्चितच स्वस्त असतो. कांदे आठ रुपये प्रतिकिलो आहेत तर कोथिंबीर 24 रुपये किलो, टोमॅटो 11 रुपये,  फ्लॉवर 12, वांगे 17, पालक 10, आंबटचुका 9, मुळा 10, दुधी भोपला 12, नवलकोल 13, बीट 13 असे प्रतिकिलोचे दर असल्याची कारागृह अधिक्षक ए.एस. सदाफुले यांनी दिली.

First published: April 7, 2020, 7:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading