Home /News /maharashtra /

हा तर निव्वळ हलगर्जीपणा! कोरोनाच्या मृत रुग्णांवेळी वापरलेले PPE कीट उघड्यावरच...

हा तर निव्वळ हलगर्जीपणा! कोरोनाच्या मृत रुग्णांवेळी वापरलेले PPE कीट उघड्यावरच...

मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारा वेळी वापरले जाणारे पीपीई कीट वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नागपूर, 03 सप्टेंबर : कोरोनाचा धोका काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. अशात एक आरोग्याशी खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या अंत्यसंस्कारा वेळी वापरले जाणारे पीपीई कीट वापरानंतर दहन घाटावरच फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे दहनघाट कोरोनाच्या प्रसाराचे केंद्र ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेसह आरोग्य यंत्रणेने याची गंभीर दखल घेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. नागपुरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या प्रचंड वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे. परंतु नागरिकांकडून बेजबाबदारपणामुळे व कोरोनाचा प्रसार होण्यास हातभार लागत आहे. याचे उत्तम उदाहरणर अंबाझरी घाटावर पाहायला मिळाले. पोहण्याचा मोह आवरला नाही म्हणून दोघांनी टाकल्या उड्या, अखेर क्षणात गेला जीव राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या जरी वाढत असली तर संक्रमणाची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या महामारीने मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला पण आता राज्यातला आणखी एक जिल्हा कोरोनाचं हॉटस्पॉट बनत असल्याचं समोर येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. VIDEO पाहून तुम्हीच म्हणाल कोरोनाचा धोका वाढला, हजारोंनी काढली मिरवणूक आणि.... नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात कोरोना रुग्णांनी 27 हजारांचा आकडा पार केला आहे. तर मृतांचा आकडा 900 च्या पार गेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात पालिकेने विनाकारण घराबाहेर न पडण्याचा आणि लॉकडाऊनचे नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms

पुढील बातम्या