इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ला

इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ला

महाविद्यालयाला सुट्या लागल्या असल्याने काही दिवसाआधी ती घरी आली होती.

  • Share this:

गोंदिया,19 डिसेंबर:एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. आचल कळंबे असे पीडितेचे नाव असून ती नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे.

या हल्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. मुख्य आरोपी खामेंद्र जगणीत (24) आणि त्याचा मित्र राहुल न्हनेद (24) हे दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

मिळालेली माहिती अशी की, विदर्भातील गोंदियात खळबांधा गावात राहणाऱ्या आचलवर एकतर्फी प्रेमातून दोघांनी अ‍ॅसिड हल्ला करून पळ काढला होता. महाविद्यालयाला सुट्या लागल्या असल्याने काही दिवसाआधी ती घरी आली होती. पुन्हा कॉलेजसाठी नागपूरला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली असता यावेळी आरोपींनी तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. अंगावर अ‍ॅसिड फेकल्याने आचल जीवाचा आकांत करत बस स्थानकावर आरडाओरड करु लागली. पोलिसांना आचल हिला तातडीने गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिक बिघडत चालल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपुरला हलवण्यात आले आहे. काही दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ती तरुणीचा पाठलाग करत होते. मात्र यावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान तरुणीने केलेले नाही. परंतु ही गोष्ट पीडितेच्या नातेवाईकांना पोलिसांनी सांगितली आहे. या हल्लानंतर ग्रामीण भागापर्यंत अ‍ॅसिड हल्ल्याचे लोण पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींकडे हे अ‍ॅसिड कुठून आले? असा सवाल उपस्थित होत आहे.

सरकारने केली होती ही घोषणा...

अ‍ॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेत सरकारने असे कृत्य हे नृशंस गुन्हा म्हणून गणला जाईल, असे सांगितले होते. पीडितांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी तपास आणि सुनावणीसाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला आहे. अ‍ॅसिड हल्ल्याचे कृत्य हा अत्यंत घृणास्पद गुन्हा म्हणून गणला गेल्यास अशा खटल्यांमधील आरोपीला अधिकाधिक शिक्षा म्हणून जन्मठेप किंवा मृत्युदंड देणे शक्य होईल, असे केंद्र सरकारने याआधीच जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 03:35 PM IST

ताज्या बातम्या