Home /News /maharashtra /

अरेरे! सख्या बहिणींचा धरणात बुडून मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

अरेरे! सख्या बहिणींचा धरणात बुडून मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

दोघी बहिणी खेळत खेळत धरणावर पोहचल्या तीथे पाण्यात उतरुन आंघोळ करत असताना खोल पाण्यात त्या पाय घसरुन पडल्या.

अमरावती 13 जून: कोरोनामुळे सगळीकडेच भयग्रस्त वातावरण असतानाच अचलपूर तालुक्यातल्या एका कुटुंबावर शनिवारी दु:खाचा डोंगर कोसळला. दोन सख्या बहिणींचा धरणातल्या खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने सगळं कुटुंबच उध्वस्त झालं आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावाला लागुन असलेल्या भुलेश्वरी धरणात या दोन सख्या बहीणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. कुणबी वाघोली येथील रश्मीता राजेश बेलसरे वय 10 वर्षे व कावेरी राजेश बेलसरे वय 8 वर्षे या दोघी बहिणी व त्यांच्या दोन मावस बहिणी खेळत खेळत धरणावर पोहचल्या तीथे पाण्यात उतरुन आंघोळ करत असताना खोल पाण्यात त्या पाय घसरुन पडल्या. त्यामुळे  दोनही बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघी मात्र सुखरूप बचावल्या. या विद्यार्थीनी जि.प शाळा गोंडवाघोली शाळेच्या असल्याची माहीती आहे. पोलिसांनी दोनही मृतदेह धरणांतून काढून पोस्ट मार्टेमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. हेही वाचा -  मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी चालतं-फिरतं बुक हाऊस; गरजुंना तुम्हीही करू शकता मदत लॉकडाऊनमध्ये पुण्यात तान्ह्या बाळाचा जीवनसंघर्ष, अशी जगतंय फाटलेल्या आभाळाखाली! मुंबईत टोयटा फॉर्चूनर कारच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू, अपघाताचे भीषण PHOTOS
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या