धक्कादायक.. गरोदर मातेचा घनदाट जंगलातून अंगावर काटे आणणारा प्रवास

धक्कादायक.. गरोदर मातेचा घनदाट जंगलातून अंगावर काटे आणणारा प्रवास

रस्त्याअभावी आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. याचे जिवंत उदाहरण आले समोर...

  • Share this:

महेश तिवारी,(प्रतिनिधी)

गडचिरोली,29 नोव्हेंबर: जिल्ह्यात रस्त्याअभावी आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजले आहेत. याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम नैताला गावातील एका गरोदर मातेचा रस्ते आणि रुग्णवाहिकेच्या अभावी आरोग्य केंद्रापर्यंतचा तब्बल 14 किलोमीटरचा प्रवास चक्क खाटेवरून करावा लागला.

नैताला या गावातील गरोदर माता राजो रानू पदा (वय-22 ) यांना प्रसूती कळा सुरू झाल्याने आरोग्य सेवक संतोष गेडाम, परिचारिका लक्ष्मी पेदापल्लीवार आणि नातेवाईकांच्या मदतीने खाटेची कावड करुन 14 किलोमीटर घनदाट जंगलातल्या पायवाटा तुडवत गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचा प्रवास अंगावर काटे आणणारा होता. राजो रानू पदा यांना प्राथमिक आरोग्य केंद्र गट्टा येथे दाखल केल्यानंतर काही वेळात वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कन्नाके यांच्या देखरेखीत सामान्य प्रसूती होऊन राजोने एक गोंडस बाळाला जन्म दिला. माता व बाळाची प्रकृती ठणठणीत असून दोघांवर पुढील उपचार सुरू आहेत.

गडचिरोलीत ऐका बाजुला आरोग्याच्या समस्या आहेत तर दुसऱ्या बाजूला रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी रस्ते पुल यांच्या सुविधा नाहीत. अनेक डॉक्टर मनापासून रुग्णसेवा करतात. पण रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच गावकऱ्यांचे आरोग्य शिक्षण होणे आवश्यक आहे.

गरोदर मातेने चुकनही खाऊ नयेत 'ही' तीन फळे

गरोदर पणात खाललेल्या पौष्टिक आहारामुळे महिलेची प्रसुती व्यवस्थित होते. त्याचबरोबर बाळाच्या आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं आहे. गरोदर पणात महिलेनं कोणती फळे खाऊ नये यासाठी हे नक्की वाचा.गरोदर पणात खाललेल्या पौष्टिक आहारामुळे महिलेची प्रसुती व्यवस्थित होते. त्याचबरोबर बाळाच्या आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं आहे.

गरोदर पणात खाललेल्या पौष्टिक आहारामुळे महिलेची प्रसुती व्यवस्थित होते. त्याचबरोबर बाळाच्या आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं आहे. गरोदर पणात महिलेनं कोणती फळे खाऊ नये यासाठी हे नक्की वाचा.

पपई हे फळ महिलांना जास्त आवडतं. पपईमुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. नजर चांगली होण्यासाठी पपई जास्त प्रमाणात खालली जाते. पण गरोदर पणात महिलेनं पपई आहारातून दूर ठेवावी. गरोदर महिलेनं पपई खाल्यास ती पचवण्यासाठी अधिक त्रासदायी ठरू शकते. कारण यातील लेटैस्क नावाचा पदार्थ गर्भाशयाला शोषून घेतो. जो आई-बाळाच्या जिवाला धोकादायक असू शकतो.पपई हे फळ महिलांना जास्त आवडतं. पपईमुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. नजर चांगली होण्यासाठी पपई जास्त प्रमाणात खालली जाते. पण गरोदर पणात महिलेनं पपई आहारातून दूर ठेवावी. गरोदर महिलेनं पपई खाल्यास ती पचवण्यासाठी अधिक त्रासदायी ठरू शकते. कारण यातील लेटैस्क नावाचा पदार्थ गर्भाशयाला शोषून घेतो. जो आई-बाळाच्या जिवाला धोकादायक असू शकतो.

पपई हे फळ महिलांना जास्त आवडतं. पपईमुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. नजर चांगली होण्यासाठी पपई जास्त प्रमाणात खालली जाते. पण गरोदर पणात महिलेनं पपई आहारातून दूर ठेवावी. गरोदर महिलेनं पपई खाल्यास ती पचवण्यासाठी अधिक त्रासदायी ठरू शकते. कारण यातील लेटैस्क नावाचा पदार्थ गर्भाशयाला शोषून घेतो. जो आई-बाळाच्या जिवाला धोकादायक असू शकतो.

गरोदरपणात अननस खाणं महिलेसाठी हानीकारक ठरू शकतं. अननस हा एक स्वादिष्ट आणि शरीरासाठी फायद्याचा फळ आहे. पण गर्भवती स्त्रीयांसाठी हा तोट्याचा ठरू शकतो. यात अधिक प्रमाणात ब्रोमेलनचं प्रमाण असतं. ते खाल्यानं महिलेचं गर्भाशय मऊ पडते. त्यामुळे गरोदर महिलेला अतिसार आणि पोटाच्या आजाराची समस्या निर्माण होते.गरोदरपणात अननस खाणं महिलेसाठी हानीकारक ठरू शकतं. अननस हा एक स्वादिष्ट आणि शरीरासाठी फायद्याचा फळ आहे. पण गर्भवती स्त्रीयांसाठी हा तोट्याचा ठरू शकतो. यात अधिक प्रमाणात ब्रोमेलनचं प्रमाण असतं. ते खाल्यानं महिलेचं गर्भाशय मऊ पडते. त्यामुळे गरोदर महिलेला अतिसार आणि पोटाच्या आजाराची समस्या निर्माण होते.

गरोदरपणात अननस खाणं महिलेसाठी हानीकारक ठरू शकतं. अननस हा एक स्वादिष्ट आणि शरीरासाठी फायद्याचा फळ आहे. पण गर्भवती स्त्रीयांसाठी हा तोट्याचा ठरू शकतो. यात अधिक प्रमाणात ब्रोमेलनचं प्रमाण असतं. ते खाल्यानं महिलेचं गर्भाशय मऊ पडते. त्यामुळे गरोदर महिलेला अतिसार आणि पोटाच्या आजाराची समस्या निर्माण होते.

द्राक्ष हे एक असं फळं आहे ज्यामुळे पोटात गरम वाटू शकतं. ते पचनाला जास्त जड आहे. आई आणि बाळ या दोघांकरिता हे फळ नुकसान देणारं आहे. यात आढळून येणारं रेस्वेरास्ट्रोल नावाचा पदार्थ हार्मोनला असंतुलित करतो. द्राक्ष हे एक असं फळं आहे ज्यामुळे पोटात गरम वाटू शकतं. ते पचनाला जास्त जड आहे. आई आणि बाळ या दोघांकरिता हे फळ नुकसान देणारं आहे. यात आढळून येणारं रेस्वेरास्ट्रोल नावाचा पदार्थ हार्मोनला असंतुलित करतो.

द्राक्ष हे एक असं फळं आहे ज्यामुळे पोटात गरम वाटू शकतं. ते पचनाला जास्त जड आहे. आई आणि बाळ या दोघांकरिता हे फळ नुकसान देणारं आहे. यात आढळून येणारं रेस्वेरास्ट्रोल नावाचा पदार्थ हार्मोनला असंतुलित करतो.

First published: November 29, 2019, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading