नागपूरमध्ये 50 वर्ष जुनी इमारत कोसळली, मलब्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू

नागपूरमध्ये 50 वर्ष जुनी इमारत कोसळली, मलब्याखाली दबून एकाचा जागीच मृत्यू

नागपूरमध्ये इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

नागपूर, 24 ऑगस्ट : राज्यात सतत सुरू असलेल्या पावसाच्या घटनांमुळे इमारती कोसळणं आणि रोड अपघात होण्याचं प्रमाणंही वाढलं आहे. नागपूरमध्ये इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटे ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळकाच मनपाचे अग्निशमन विभागाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. नागपूरच्या सदर भागात आज पहाटेच्या सुमारास तब्बल 50 वर्ष जुनी इमारत कोसळली. रहिवासी इमारत असल्यामुळे यामध्ये चार जण अडकले असून चाक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

कोरोनाचा गर्भ नाभीवरही गंभीर परिणाम, मुंबईत गर्भपाताच्या प्रकरणाने डॉक्टर हैराण

मनपाच्या अग्निशमन विभागान चार जणांना रेस्क्यू करून बाहेर काढलं आहे. तर यामध्ये आता 43 वर्षीय किशोर टेकसुल्तान नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तीनजण जखमी आहे. आता रेस्क्यू ऑपरेशन संपलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. या अपघाताचे काही व्हिडिओदेखीस समोर आले आहे.

कोण सांभाळणार काँग्रेसची कमान, आजच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

खरंतर, राज्यात सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे पावसाळ्याआधी अनेक जुन्हा इमारतींचं ऑडिट केलं गेलं नाही. त्यामुळे अशा इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2020, 10:11 AM IST

ताज्या बातम्या