मुख्याधिकाऱ्याची क्रूरता.. 90 श्वानांना ठार मारून फेकले गिरडा जंगलात

मुख्याधिकाऱ्याची क्रूरता.. 90 श्वानांना ठार मारून फेकले गिरडा जंगलात

या गुन्ह्यात भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी आरोपी करणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले आहेत.

  • Share this:

अमोल गावंडे, (प्रतिनिधी)

बुलडाणा, 13 सप्टेंबर: शहरापासून जवळच असलेल्या गिरडा जंगलात 6 सप्टेंबर रोजी मृतावस्थेत सापडलेले 80 ते 90 श्वानप्रकरणाचा छडा लावण्यात बुलडाणा पोलिसांना यश मिळाले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील 5 आरोपींना बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. भोकरदन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरात श्वान पकडण्याची मोहीम राबवण्यात आली. नंतर पकडलेल्या श्वानांची क्रूरपणे हत्या करून त्यांचे हात-पाय बांधून नगर परिषदेच्या 5 स्वछता वाहनातून आणून गिरडा जंगलात फेकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यासह इतर अधिकाऱ्यांनी आरोपी करणार असल्याचे संकेत जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

गिरडा या गावाजवळच्या जंगलाच्या रस्त्याच्या कडेला शुक्रवारी (6 सप्टेंबर) 80 ते 90 श्वान मृतावस्थेत आढळून आले होते. वेगवेगळ्या 5 गंजीत या मृत श्वानांना टाकण्यात आले होते. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्यानंतर हे प्रकरण समोर आले. वनविभागाने घटनास्थळ गाठून जेसीबी मशीनच्या साहाय्याने मोठा खड्डा करून मृतश्वानचे शवविच्छेदन करून त्यांची विल्हेवाट लावली होती. या प्रकरणी वनविभागाच्या क्षेत्रात अशा पद्धतीने श्वानांचे हात-पाय बांधून क्रूतेने मारुन आणून टाकल्याप्रकरणी वनपाल राजेश शिपे यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावरून अज्ञातांविरुद्ध कलम 429 नुसार बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशी केली असता भोकरदन येथील सिद्धेश्वर नारायण गायकवाड, अनिल वसंत गायकवाड, संतोष सीताराम शिंदे, शेख सलीम शेख शोकात, विष्णू उर्फ बाबासाहेब सूर्यभान गायकवाड या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या आदेशाने शहरातील श्वान पकडण्याची मोहीम राबवली असल्याचे आरोपींनी कबुली दिली. नगर परिषदेचे 5 स्वछता वाहनातून श्वानांना मारहाण करून त्यांचे हात-पाय बांधून या श्वानांना गिरडा जंगलात आणून टाकल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणाची गंभीर दखल जिल्हा प्राणी क्लेश समितीने देखील घेतली आहे. समितीची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक झाली. या प्रकरणात आरोपींनी श्वानांची क्रूरपणे,  निर्दयतेने हत्या करून प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960 अन्वये कलमांचे उल्लंघन करून भारतीय दंड संहिता कलम 429 नुसार 5 वर्षपर्यंत कारावास आणि  दंडाची तरतूद लक्षात घेता पोलीस प्रशासनाने दोषी व्यक्तींविरूद्ध तातडीने कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा या समितीने दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.

VIDEO: दारूच्या अड्ड्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसालाच महिलांनी केली मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2019 01:49 PM IST

ताज्या बातम्या