65 वर्षीय शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खून; एकाच कुटुंबातील चौघांना बेड्या

65 वर्षीय शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खून; एकाच कुटुंबातील चौघांना बेड्या

वाशीम तालुक्यातील फाळेगावच्या वाडीचा मारोती शेतशिवारात 65 वर्षीय शेतकऱ्याची शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.

  • Share this:

किशोर गोमाशे, (प्रतिनिधी)

वाशिम, 17 ऑगस्ट- वाशीम तालुक्यातील फाळेगावच्या वाडीचा मारोती शेतशिवारात 65 वर्षीय शेतकऱ्याची शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. रामचंद्र बळीराम कोरडे असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांना अटक केली आहे. केशव जाधव, बालाजी जाधव, संतोष जाधव व आकाश संतोष जाधव (सर्व रा.फाळेगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी की, मृत रामचंद्र कोरडे व केशवराव जाधव आणि त्यांच्या 2 मुलांची शेजारी शेजारी शेतजमीन आहे. दोघांमध्ये शेतामध्ये येणाऱ्या रस्त्यावरून जुना वाद होता. त्या वादातूनच शनिवारी (17 ऑगस्ट) सकाळी रामचंद्र कोरडे यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.या खूनप्रकरणी एकाच कुटुंबातील वडील, 2 मुले व एक 19 वर्षीय नातू अशा चौघांना अनसिंग पोलिसांनी अटक केली आहे. एका क्षुल्लक कारणावरून खून झाल्यामुळे 2 कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत.

काँग्रेसचे 'गोल्डमॅन' गोवींद कोकुलवार यांच्या पाठीवर झाडली गोळी

काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि नांदेडचे गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील चौफाळा भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर शनिवारी (17 ऑगस्ट) सायंकाळी सहाच्या सुमारास गोविंद कोकुलवार त्यांच्या पाठीवर अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडली. या हल्यात कोकुलवार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नांदेडमधील खासगी रूगणलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोकुलवार यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईला हलवण्याची तयारी सुरु आहे.

गोवींद कोकुलवार हे शनिवारी सायंकाळी चौफाळा भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आले असता दूचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या पाठीवर जवळून गोळी झाडली. नंतर हल्लेखोर पसार झाला. दरम्यान, या घटनेनंतर चौफाळा भागात तणाव पसरली आहे.

खंडणीसाठी धमकी...

काही दिवसांपूर्वी गोविंद कोकुलवार यांना खंडणीसाठी धमकी आल्याची देखील माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी शहरात दोन व्यापाऱ्यांवर देखील गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

कोल्हापुरात पूरग्रस्तांमध्ये हाणामारी, काय घडलं नेमकं पाहा हा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: August 17, 2019, 9:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading