तुकाराम मुंढेंनी 'करून दाखवलं' पालिकेच्या कामाची सर्वांनीच घेतली दखल

तुकाराम मुंढेंनी 'करून दाखवलं' पालिकेच्या कामाची सर्वांनीच घेतली दखल

कोविड-19 सामना करत असताना नागपूर महानगरपालिकेने पाच रुग्णालयांची क्षमता वाढवली आहे. अवघ्या 45 दिवसात ही किमया घडली.

  • Share this:

नागपूर, 18 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना आणि पावसाळ्याच्या तोंडावर संकटाशी दोन हात करण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे  महापालिकाचे पाच हॉस्पिटलचा कायापालट केला आहे.

कोविड-19 सामना करत असताना  नागपूर महानगरपालिकेने पाच रुग्णालयांची क्षमता वाढवली आहे. अवघ्या 45 दिवसात ही किमया घडली. कुठल्याही खासगी रुग्णालयांना आणि कॉर्पोरेट कार्यालयांना लाजवेल, असे या रुग्णालयांचे रूप पालटले आहे. इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालय पाचपावली या तीन रुग्णालयांचा पूर्णतः कायापालट झालेला आहे.

ओव्हरटेक करू दिले नाही म्हणून पोलिसांची महामार्गावर तरुणांना मारहाण, अखेर...

के.टी. नगर रुग्णालय आणि आयुष हॉस्पिटल, सदर ही दोन रुग्णालये नव्याने तयार करण्यात आली आहेत. ही पाचही रुग्णालये मिळून एकूण 450 बेड्स असलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक बेडला सेंट्रल ऑक्सिजन आणि सेंट्रल सक्शनची सोय आहे. 450 बेड्सपैकी इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी. नगर हॉस्पिटलमध्ये ५० बेड्सचा अतिदक्षता विभाग आहे. के.टी. नगर आणि सदरचे आयुष हॉस्पिटल वगळता अन्य तीन रुग्णालयातील 300 बेड्स सेवेसाठी सज्ज झाले आहेत. पुढील सात दिवसात उर्वरीत 150 बेड्सही सज्ज होतील.

21 महिने झाले तरी लेकावर केले नाही अंत्यसंस्कार, घरातच जपून ठेवला सांगाडा

'लॉकडउनच्या काळात संधी समजून या रुग्णालयांचा केलेला कायापालट हा केवळ आणि केवळ नागरिकांच्या सेवेसाठीच आहे. आम्ही केवळ बदलावर नाही तर संपूर्ण परिवर्तनावर विश्वास ठेवतो. हे परिवर्तन आपल्यासाठी आहे. नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि परिवर्तनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे', असं आवाहन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं.

संपादन - सचिन साळवे

First published: June 18, 2020, 11:49 AM IST
Tags:

ताज्या बातम्या