धडाकेबाज गडकरींकडून विदर्भवासीयांना आशा

धडाकेबाज गडकरींकडून विदर्भवासीयांना आशा

आता धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं आलंय. त्यामुळे विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांना संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झालीय.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 06 सप्टेंबर : नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंधारण केंद्रीय मंत्रालयाची जबाबदारी आल्यामुळे विदर्भातल्या लोकांच्या आशा वाढल्यात. गडकरींच्या कामांचा धडाका बघता विदर्भातले रखडलेले अनेक सिंचन प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा विदर्भातल्या लोकांना आहे.

विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांसाठी  हजारो कोटींचा निधी आला. मात्र पाण्याऐवजी पैसाच वाहिल्यानं शेतकरी आणि शेती तहानलेलीच राहिली. पण आता धडाकेबाज कामांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय जलसंपदा खातं आलंय. त्यामुळे विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांना संजीवनी मिळण्याची आशा निर्माण झालीय.

जनमंचचे अध्यक्ष अनिल किलोर म्हणाले, ' विदर्भातील गोसेखुर्द आणि बेबळा हे दोन प्रकल्प या योजनेतील आहेत. गोसेखुर्दमुळे अडीच लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे दोन्ही प्रकल्पामुळे विदर्भाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. '

पंधरा ते वीस वर्षापूर्वी विदर्भात सुरू झालेल्या २६ प्रकल्पांना केंद्राने मदतीचा हात देऊ केलाय. सध्या या प्रकल्पांना १८ हजार सहाशे चोपन्न कोटींची आवश्यकता आहे. यापैकी केंद्र सरकारचा वाटा १० हजार ६१५ कोटी इतका आहे.

खरं तर देशभरातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मदतीचा हात दिला होता. पण  राष्ट्रीय प्रकल्प असणारा गोसेखुर्द गेल्या ३५ वर्षांपासून अद्याप पूर्ण झालेला नाही. यापूर्वीच्या मंत्री उमा भारती यांनी हा प्रकल्प केव्हा पुर्ण होणार हे सांगता येणार नाही  असे वक्तव्यही  केले होते.  पण मोदी सरकारमधील हेवीवेट मंत्री नितिन गडकरी विदर्भातील प्रकल्पासाठी मोठा निधी खेचून आणतील असे मानले जात आहे.

अगदी काँग्रेसलाही नितीन गडकरी यांच्याकडून आशा आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री झाल्यावर नितीन गडकरींनी हजारो कोटींचे प्रकल्प विदर्भात आणले. याच धर्तीवर सिंचन प्रकल्पांनाही गती मिळण्याची आशा विदर्भातल्या लोकांना गडकरी यांच्याकडून आहे.

First published: September 6, 2017, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading