EXIT POLL 2019 LIVE : विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

EXIT POLL 2019 LIVE : विदर्भात महायुतीचंच वर्चस्व, News 18 लोकमत आणि IPSOS च्या सर्व्हेचा अंदाज

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत विदर्भात भाजप- शिवसेना महायुतीला 54 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये भाजपला 43 तर शिवसेनेला 12 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत विदर्भात भाजप- शिवसेना महायुतीला 54 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये भाजपला 43 तर शिवसेनेला 12 जागा मिळतील, असा अंदाज आहे. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मागच्या दोन निवडणुकांमध्ये इथे भाजपचंच वर्चस्व होतं. इथे काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला 4 जागांवर समाधान मानावं लागेल, अशी शक्यता आहे. यातल्या 2 जागा काँग्रेसला तर 2 राष्ट्रवादीला मिळतील, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अशा 3 दिग्गज भाजप नेत्यांच्या विदर्भात काय निकाल येतात यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यामुळे या मतदारसंघावर सगळ्यांचंच लक्ष आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

शिवसेना 04

भाजप 42

राष्ट्रवादी 01

काँग्रेस 10

अपक्ष 03

(हेही वाचा : मतदारांना पैसे वाटताना रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडले)

2009 विधानसभा निवडणुकीचा निकाल

शिवसेना 08

भाजप 18

राष्ट्रवादी 04

काँग्रेस 23

अपक्ष 07​

====================================================================================================

VIDEO : संभाजीराजेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या