बंडखोरीनं भंगणार मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वप्न, वाचा Inside Story

मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत:पुढाकार घेत अनेकांना बंडखोरी मागे घेण्यासाठी फोन केले होते. मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2019 02:03 PM IST

बंडखोरीनं भंगणार मुख्यमंत्री फडणवीसांचं स्वप्न, वाचा Inside Story

मुंबई 24 ऑक्टोंबर : अब की बार 220 पार, भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करण्या ऐवढ्या जागा मिळवणार, विरोधी पक्ष शिल्लकच राहणार नाही अशी घोषणा करणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून महाभरती करून भाजपने राज्यात सगळ्याच पक्षांमध्ये धास्ती निर्माण केली होती. मात्र त्याचा तेवढा फायदा भाजपला झाला नाही असं आता स्पष्ट होतंय. विदर्भासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई, ठाण्यासह मोठी बंडखोरी झाल्याने त्याचा फटका भाजपला बसला आहे. यामुळे 220 हा महाबहुमताचा आकडा पार करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने भाजपकडे मागितलं मुख्यमंत्रिपद,50-50 फॉर्म्युल्याची अट,सूत्रांची माहिती

इतर पक्षातल्या नेत्यांना घेतल्याने भाजपमधले अनेक नेते दुखवले गेले होते. वर्षानुवर्ष पक्षाचं काम करून, खस्ता खाऊन आम्ही आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या काय असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांनी विचारला होता. त्यामुळे पक्षाच्या अनेक निष्ठावंतांनी बंडखोरी केली होती. त्याचा मोठा फटका भाजपला बसलाय. भाजप सेनेच्या अनेक  जागा बंडखोरांच्या मतांमुळे हातच्या गेल्याचं स्पष्ट होतंय.

भाजपने जे दावे केले होते त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार टीका केलीय. भाजपला उन्माद लोकांना पसंत पडला नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली. बंडखोरांना समजविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वत:पुढाकार घेत अनेकांना फोन केले होते. आणि जे बंडखोर ऐकणार नाहीत त्यांना इशाराही दिला होता. मात्र याचा कुठलाही फायदा भाजपला झाला नसल्याचं आता स्पष्ट झालंय.

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच 'भाजप'ला धक्का, विदर्भानं बिघडवलं गणित!

Loading...

2014 ची विधानसभेची परिस्थिती

मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युती तुटली आणि आघाडीनेही काडीमोड घेतला. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा धुव्वा उडवत भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. शिवसेनेला 63 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

एकूण जागा - 288

भाजप - 122

शिवसेना - 63

काँग्रेस - 42

राष्ट्रवादी - 41

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...