Maharashtra Election Result 2019 : कुणाला दणका? कुणी मारली बाजी? आयारामांचं काय झालं ते जाणून घ्या!

Maharashtra Election Result 2019 : कुणाला दणका? कुणी मारली बाजी? आयारामांचं काय झालं ते जाणून घ्या!

जे नेते भाजप आणि शिवसेनेत गेले त्यातल्या अनेक दिग्गजांना लोकांनी घरचा रस्ता दाखवला

  • Share this:

मुंबई 24 ऑक्टोंबर : विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्वाधिक मुद्दा गाजला तो 'मेगाभरती'चा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून मोठ्या संख्येने अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झालं होतं. राष्ट्रवादीतून अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत गेले त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. 30-40 वर्ष पवारांसोबत काम केलेले अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोडून गेले. यातल्या अनेकांना भाजप-शिवसेनेने तिकीटं दिलीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखवले गेले आणि त्यांनी बंडखोरी केली. त्याचा फटका त्या त्या पक्षांना बसला. बंडखोरीमुळेच भाजपची संख्या कमी झाली असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मान्य केलं. जे नेते भाजप आणि शिवसेनेत गेले त्यातल्या अनेक दिग्गजांना लोकांनी घरचा रस्ता दाखवला. तर काही लोक निवडून आलेत.

मुख्यमंत्रिपदावर आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

आयारामांचं काय झालं जाणून घ्या?

गणेश नाईक (भाजप)  जिंकले

शिवेंद्रराजे (भाजप) जिंकले

राहुल नार्वेकर (भाजप) जिंकले

नितेश राणे (भाजप) जिंकले

राणा जगजीतसिंह पाटील (भाजप) जिंकले

कालिदास कोळंबकर (भाजप) विजयी

भास्कर जाधव (शिवसेना) जिंकले

रश्मी बागल (शिवसेना) जिंकली

अब्दुल सत्तार (शिवसेना) विजयी

विधानसभा निकालाची ही आहेत 10 मुख्य वैशिष्ट्य

वैभव पिचड, भाजप ( पराभूत )

दिलीप सोपल, शिवसेना (पराभूत)

जयदत्त क्षीरसागर, शिवसेना (पराभूत)

निर्मला गावित, शिवसेना ( पराभूत )

गोपिचंद पडळकर, भाजप ( पराभूत )

अमल महाडिक, कोल्हापूर दक्षिण ( पराभूत )

समरजित घाडगे, कागल, ( पराभूत )

15 बंडखोरांशी बोलणं झालंय, त्यांचा भाजपला पाठिंबा- मुख्यमंत्री

काय म्हणाले मुख्यमंत्री?

जनेतेनं अतिशय मोठा निर्णय दिला असून तो आम्ही मान्य करतो. सरकार स्थापनेसाठी राज्यातल्या जनतेनं आम्हाला कौल दिलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मागच्या वेळेसपेक्षा काही जागा कमी असल्या तरी आमचा स्ट्राइक रेट अतिशय चांगला आहे असंही त्यांनी सांगितलंय. बंडखोरीमुळे भाजपला फटका बसला असल्याचं त्यांनी मान्य केलं. जे बंडखोर निवडून आले त्यातल्या अनेकांशी माझं बोलणं झालं असून किमान 15 लोकांनी मला पाठिंबा देण्याचं मान्य केलं असा खुलासाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. आमचं ठरलं असून त्याच प्रमाणं पुढे जाऊ असंही ते म्हणाले.

महाराष्ट्रात वंचित उघडणार खातं, हा आहे मतदारसंघ

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, जे ठरलं त्यानुसारच पुढे जाऊ. आत्ताच या प्रश्नावर काहीही उत्तर देणार नाही. तुम्ही कितीही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर देणार नाही. विरोधीपक्षांनी जास्त हुरळून जाऊ नये. त्यांना फार काही करता आलं नाही. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ऐकली आहे, आमचं सर्व काही सुरळीत होईल असंही ते म्हणाले. युती म्हणून लढलो आणि आमची तीच भावना कायम आहे असंही ते म्हणाले. आमचे काही मंत्री पराभूत झाले ते का पराभूत झाले याचा विचार करू. उदयनराजे भोसले आणि पंकजा मुंडे यांचा पराभव धक्कादायक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2019 07:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading