उठाबशा पीडित विद्यार्थिनीवर आता मुंबईत उपचार, न्यूज18लोकमत इम्पॅक्ट

उठाबशा पीडित विद्यार्थिनीवर आता मुंबईत उपचार, न्यूज18लोकमत इम्पॅक्ट

500 उठाबशा शिक्षा प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला मुंबईला हलवलंय. माझी मुलगी लवकर बरी व्हावी, म्हणून आम्ही तिला मुंबईच्या केईएममध्ये हलवतोय, अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडील वडिलांनी दिली.

  • Share this:

15 डिसेंबर : 500 उठाबशा शिक्षा प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला मुंबईला हलवलंय.  माझी मुलगी लवकर बरी व्हावी, म्हणून आम्ही तिला मुंबईच्या केईएममध्ये हलवतोय, अशी प्रतिक्रिया मुलीच्या वडील वडिलांनी दिली. शिवाय त्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभारही मानले. आता मुलीवर  पुढील उपचार मुंबईच्या केईएममध्ये होणार  आहेत. न्यूज18 लोकमतच्या बातमीने प्रशासनाला जाग आली.

कोल्हापूर जिल्ह्यातील कानूर गावात ही घटना घडली आहे. या गावातील भावेश्वरी शाळेत संबंधित विद्यार्थिनी आठवीत शिकते आहे. तिने गृहपाठ केला नव्हता. या कारणासाठी शाळेच्या शिक्षिका अश्विनी देवाण यांनी तिला 500 उठबशा काढण्याची शिक्षा सुनावली. 300 उठबशा काढल्यावर मुलगी कोसळली. तिला तात्काळ रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा सुनावणाऱ्या मुख्याध्यापिका  अश्विनी देवाण यांना अटक करण्यात आली आहे. पण तिला जामीनही मिळाला. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला अशी शिक्षा सुनावणाऱ्या या मुख्याध्यापिकेची बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 01:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading