आरोपीची हिम्मत बघा, बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या मुलीला जिवंत पेटवलं

आरोपीची हिम्मत बघा, बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या मुलीला जिवंत पेटवलं

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

  • Share this:

अहमदनगर, 15 ऑगस्ट : बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने अहमदनगरमध्ये एका आरोपीने थेट पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

राजाराम तरटे आणि अमोल तरटे या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींनी पारनेरमधील आदिवासी समाजातील 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपींनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्यास सांगितले.

राज्यात ST बस आणि कोचिंग क्लासेस होणार सुरू, विजय वडेट्टीवार यांची माहिती

पीडितेने त्यांची मागणी मान्य न केल्याने आरोपींनी थेट अत्याचारित पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवलं. या घटनेत मुलगी गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुन्हेगारीच्या अशा घटना भर दिवसा घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर जिल्ह्यांत पोलिसांचा धाक कमी असल्यामुळे अशा घटना समोर येतात अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 15, 2020, 7:03 PM IST

ताज्या बातम्या