पिंपरी, गोविंद वाकडे, 03 जून : विश्व हिंदु परिषदेनं विनापरवाना काढलेल्या शोभा यात्रेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. विना परवाना काढलेल्या शोभा यात्रेमध्. विश्व हिंदु परिषदेतील मुलींनी एअर रायफलच्या साहाय्यानं हवेत गोळीबार केला. शिवाय, तलवारी देखील नाचवल्या. त्यामुळे विश्व हिंदु परिषदेच्या 200 ते 250 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी काढलेल्या शोभायात्रेत 200 ते 205 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीनं ही शोभा यात्रा काढली होती.
शोभा यात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल होती. एअर रायफलचा ट्रिगर दाबल्यानं मोठा आवाज देखील झाला होता. तर, पाच मुली हातात तलवार मिरवत असल्याचं दिसून आलं होतं. यानंतर आता निगडी पोलिसांनी आर्म एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांचं नाव देखील या गुन्ह्यात आहे.
VIDEO : 'उदयनराजे तुम्ही आमच्यासाठी वंदनीय, पण पुरंदरेंना आम्ही...', संभाजी ब्रिगेड आक्रमक