पुढच्या आठवड्यात राज्यभर पावसाची विश्रांती, हवामान खात्याचा अंदाज

पुढच्या आठवड्यात राज्यभर पावसाची विश्रांती, हवामान खात्याचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर पुढच्या आठवड्याभरातही पावसाचा जोर कायम असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 18 ऑगस्ट : राज्यात कोकणासह सर्वच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने संपूर्ण राज्यात जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकणी अतिवृष्टी झाल्यामुळे पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला. कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं. ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये थैमान घातलेल्या पावसाने आता मात्र विश्रांती घेतली आहे. राज्यातल्या तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर पुढच्या आठवड्याभरातही पावसाचा जोर कायम असणार आहे. पुण्याच्या घाटमाथ्यावर आज आणि उद्या पावसाचा जोर असेल असं हवामान खात्याचं म्हणणं आहे. तर काही दिवस राज्यभर हलका पाऊस असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. नद्यांना महापूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूरमुळे सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे.

इतर बातम्या -  VIDEO: केरळच्या पुरामध्ये 113 जणांचा मृत्यू, सकाळच्या टॉप 18 न्यूज

सर्वसामान्यांचा सगळा संसार पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. तब्बल 8 ते 9 दिवस पुराचं पाणी गावांमध्ये होतं. त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. तर अनेकाचं घरं पाण्याखाली वाहून गेली. पुराचं पाणी जरी आता ओसरलं असलं तरी संपूर्ण संसार पुन्हा सुरू करण्याचं मोठं संकट सांगली आणि कोल्हापूरकरांवर आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्याभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.

पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यभरात पावसाची विश्रांती असणार आहे. तर शनिवारी राज्यात बुलढाण्यामध्ये सगळ्यात जास्त 5 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात नाशिकमध्ये 2 मिमी, पुण्यात 0.2 मिमी, महाबळेश्वरमध्ये 0.7 मिमी आणि सांगलीत 0.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: 'माय नेम इज यश खान', मुस्लिम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 12:26 PM IST

ताज्या बातम्या