पुण्यात मुसळधार पावसाने 11 जणांचा जीव घेतला, 4 अद्याप बेपत्ता!

पुण्यात मुसळधार पावसाने 11 जणांचा जीव घेतला, 4 अद्याप बेपत्ता!

प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात तब्बल 10 जण वाहून गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील 5 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून इतर जणांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 26 सप्टेंबर : मुंबई, कोकणसह पावसाची संततधार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात तब्बल 10 जण वाहून गेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यातील 5 जणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून इतर जणांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. NDRFची तीन पथकं यासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत.

पुणे शहराला रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आंबील ओढा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे लोकांच्या घरात पाणीच पाणी शिरलं आहे. कात्रज, बिबवेवाडी , सहकारनगर, हनुमाननगर, दत्तवाडी, दांडेकर पूल कोल्हेवाडी, किरकीटवाडी, मांगडेवाडी भागातील घरांमध्ये गुडघ्याभर पाणी शिरलं आहे. .3 ते 4 जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक भागात विजपुरवठा बंद करण्यात आला आहे. कात्रज नवीन बोगद्यात पाणी साचल्याने वाहने अडकून पडली आहेत. एनडीआरएफच्या तुकड्या कात्रजमध्ये दाखल झाल्यात. दांडेकर पूल इथल्या ओढ्याशेजारील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरलं आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्काळ मदतीचं आवाहन केलं आहे.

उत्तर पुणे जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूरमधील मुख्य बाजारपेठेत पाणी साचलं होतं. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची पुरती तारांबळ उडाली होती. उत्तर पुणे जिल्ह्यात पावसामुळे भाजीपाला आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आधीच पिकांना बाजार भाव नसल्यामुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झालेला आहे. त्यात परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामध्ये सोयाबीन, कोबी, झेंडू तसेच केळी अशी पिके आहेत.

मुसळधार पावसामुळे बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे नदीतून 90 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कऱ्हा नदीच्या पातळीत पहिल्यांदाच एवढी वाढ झाल्याने बारामतीमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

इतर बातम्या - बाबासाहेब आंबेडकरांचे हे 5 विचार तुम्हाला आजही पटतील!

औरंगाबाद जायकवाडी धरणाचे आणखी 6 दरवाजे उघडण्यात आलेत. म्हणजे एकूण 16 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आपत्कालीन दारही उघण्याची तयारी करून ठेवण्यात आली आहे. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यानं जायकवाडीत पाण्याची आवक वाढली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदी काठावरील गावांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात तुफान पावसाने रस्ता वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गोदावरी एक्स्प्रेस गेल्या 3 तासांपासून एकाच ठिकाणी उभी असलेली गाडी अखेर रवाना झाली आहे. तर 7 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

रस्त्यावर आणि रेल्वे रुळावर पावसाचं पाणी आल्याने मुंबईवरून नाशिकला येणाऱ्या सर्व गाड्या घोटी , इगतपुरी रेल्वे स्टेशन वर थांबवण्यात आल्या आहेत. नाशिकच्या चाकरमान्यांना गाडीतच मुक्काम करावा लागणार असल्याचे दिसून येते आहे. पाऊस कधी कमी होईल आणि रस्ता, रेल्वे वाहतुक सेवा कधी सुरळीत होईल याकडे प्रवसाच्यांचे लक्ष लागून आहे.

इतर बातम्या - क्षुल्लक कारणावरून झाली बाचाबाची... औरंगाबादमध्ये एका कुटुंबातील तिघांचा खून

वणी सप्तश्रृंगी गडावरही पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. गडाच्या घाटात पाणीच पाणी झालं आहे. गणेश घाटात धबधबा प्रवाहीत झाला आहे. घाटातील रस्ते जलमय झालेत. त्यामुळे वाहनं जपून चालवण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झालंय. या पावसानं गोदावरी नदीपात्रात चांगलीच वाढ झाली आहे. शहरातून जाणाऱ्या या गोदावरी नदीचं पात्र या पावसानं पूर्ण भरलं आहे. अहिल्याबाई होळकर पुलाखालून पाणी वेगानं प्रवाहीत होत असल्यानं पात्रातील लहान मंदिरं पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक घरांमध्ये 4 फुटांपर्यंत पाणी घुसलं आणि त्यामुळे बहुतांश नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. मात्र, पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो हिंजवडी परिसरातील IT अभियंत्यांना, पावसामुळे हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांची अशी चाळण झाली आहे.

सोलापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलं. सोलापूर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलं आहे.

इतर बातम्या - शरद पवारांवरील कारवाईबाबत काय आहे भाजपची भूमिका? महाजन म्हणतात...

येत्या 24 तासांता पावसाचा जोर वाढणार...

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण राजस्थान परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचवेळी अरबी समुद्रातून बाष्प घेऊन जाणारे वारे वाहत असल्यामुळे पुढच्या दोन दिवस हा पाऊस असाच कोसळत राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आल आहे. पुढच्या 48 तासांत पावसाचा जोर वाढणार  असल्याचंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

शरद पवारांवर कारवाई का? गिरीश महाजनांची UNCUT मुलाखत

First published: September 26, 2019, 7:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading