• होम
  • व्हिडिओ
  • तुमच्या ताटातली भाजी 'या' नाल्याच्या पाण्यातून पिकवलेली तर नाही ना? मग VIDEO पाहाच!
  • तुमच्या ताटातली भाजी 'या' नाल्याच्या पाण्यातून पिकवलेली तर नाही ना? मग VIDEO पाहाच!

    News18 Lokmat | Published On: May 16, 2019 06:13 AM IST | Updated On: May 16, 2019 07:06 AM IST

    ठाणे, 16 मे : डोंबिवलीजवळच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ 15 ते 20 एकर परिसरात नाल्याच्या पाण्याचा आणि केमिकल मिश्रित पाण्याचा वापर करून शेती केली जात असल्याची बाब समोर आली आहे. ठाकुर्ली परिसरात रेल्वेचं बंद पडलेलं पॉवर हाऊस आहे. या पॉवर हाऊसच्या आजूबाजूच्या जागेवर अनेक वर्षांपासून शेती केली जाते. या शेतीसाठी लागणारं पाणी बाजूच्या नाल्यातून पाईप टाकून घेतलं जातं. या पाण्यावर पालक, लाल माठ, मुळा, मेथी, भेंडी या भाज्या पिकवल्या जातात. अशा भाज्या नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि राजकीय पक्षांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading