मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अपघात झाला पण 'तो' नाही खचला, दोन्ही हात तुटल्यानंतरही जिद्दीने विकतोय भाजी!

अपघात झाला पण 'तो' नाही खचला, दोन्ही हात तुटल्यानंतरही जिद्दीने विकतोय भाजी!

अडचणींसोबत दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा संकटांपुढे हाय खातात. पण तिथेच आणखी थोड आजूबाजूला पाहिल तर याच संकटांपेक्षा मोठ्या अडचणींशी हसतहसत संघर्ष करणारे ही दिसतात.

अडचणींसोबत दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा संकटांपुढे हाय खातात. पण तिथेच आणखी थोड आजूबाजूला पाहिल तर याच संकटांपेक्षा मोठ्या अडचणींशी हसतहसत संघर्ष करणारे ही दिसतात.

अडचणींसोबत दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा संकटांपुढे हाय खातात. पण तिथेच आणखी थोड आजूबाजूला पाहिल तर याच संकटांपेक्षा मोठ्या अडचणींशी हसतहसत संघर्ष करणारे ही दिसतात.

पुणे, 25 फेब्रुवारी : छोट्या छोट्या गोष्टींवरून नैराश्य येणाऱ्या अनेक व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. अडचणींसोबत दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा संकटांपुढे हाय खातात. पण तिथेच आणखी थोड आजूबाजूला पाहिल तर याच संकटांपेक्षा मोठ्या अडचणींशी हसतहसत संघर्ष करणारे ही दिसतात. असाच एक संघर्ष योद्धा नागेश किनूर.

हडपसरच्या भाजी मंडईत गेले दोन वर्ष कुतूहलाचा विषय असलेल्या नागेश किनूरची कहाणी मन हेलावून टाकणारी आहे. हडपसरच्या गाडीतळ पुलाखालच्या भाजी मंडईत रोज लक्ष वेघून घेणारा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तुम्ही त्या भाजी विक्रेत्याच्या समोर जाऊन उभे राहिलात भाजी विकत घेतली की, अगदी सराईत असल्यासारखा तो भाजी वजन करून तुमच्या पिशवीत ओतून देतो आणि तेव्हाच तुम्हाला धक्का बसतो. पिशवीत भाजी ओतणाऱ्या नागेशचे दोन्ही हात थोटके असल्याचं तुमच्या लक्षात येईल. नागेशला दोन्ही हाताचे पंजेच नाहीयेत. तरी अर्धवट हातांनी तो रोजची रोजीरोटीची जबाबदारी ओढतोय. ज्यांचे हातपाय धडधाकट आहेत पण हिंमत नाही त्यांनी काळीज घट्ट करून नागेशला भेटायलाच हवं त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष बघायलाच हवा.

नागेश १९९७ ला अक्कलकोटहून पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता. बिगारी काम करून पोट भरणाऱ्या नागेशला थोडा आधार मिळला. त्यानंतर तो स्थिरस्थावर होतोय तोच त्याच्या आयुष्यात जबरदस्त अपघात घडला आणि त्याच्या दोन्ही हाताचे पंजे कापून टाकावे लागले. बिगारी काम करत असताना शॉक लागून त्याचे दोन्ही हात निकामी झाले.

मदत कुणी केलीच नाही मात्र रडतखडत तब्बल तीन वर्ष नागेश ने हॉस्पिटलमध्ये काढले. नुकतंच लग्न झालेल्या नागेशला समोर अंधार दिसत होता. पण त्याही स्थितीत त्याने लढाई सुरूच ठेवली. मंडईत आधी हमाली आणि आता भाजी विक्री करून जवळपास चार वर्षापासून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो.

त्याला दोन गोड मुलं ही आहेत. त्याला आलेल्या अकाली अपंगात्वामुळे अडचणी येऊ नये म्हणून त्याची पत्नी सुवर्णा ही रोज त्याला सोबत मदत करते. त्यामुळे नागेश रोजच्या लढाईत नियतीवर मात करतो. मनपाचा अतिक्रमण विभाग रोज कारवाईला येतो त्यावेळी भाजीपाला घेऊन पळण्यासाठी सगळ्या विक्रेत्यांची धावपळ उडते. तेव्हाही नागेशचा वेग अचंबित करणारा असतो. पण हे थांबावं आणि काहीतरी ठोक कायमच व्यवसाय म्हणून मिळावं अशी त्याची अपेक्षा आहे.

नागेशची आर्थिक स्थिती बेताचीच आहे, मात्र, हात नसताना परिस्थितीशी दोन हात करण्याची त्याची इच्छाशक्ती दुर्दम्य आहे. गरज आहे ते त्याला खंबीर हातांच्या मदतीची..

First published:

Tags: Pune