पितृपक्ष आणि अतिवृष्टीमुळे भाज्या महागल्या

पितृपक्ष आणि अतिवृष्टीमुळे भाज्या महागल्या

गेल्या दोन आठवड्यात भाज्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झालीय. या आठवड्यातील भाज्यांच्या अतिवृष्टीमुळे भाजी कमी येत असल्यामुळे भाव वाढले आहेत. तर दलालांमुळे कृत्रिम तुटवडा होत असल्याच विक्रेत्यांच म्हणणं आहे.

  • Share this:

09सप्टेंबर: पितृपक्ष आणि अतिवृष्टीमुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पितृपक्षात लागणाऱ्या भाज्या १५ ते २० रूपयांनी महागल्या आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागते आहे.

गेल्या दोन आठवड्यात भाज्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झालीय. या आठवड्यातील भाज्यांच्या अतिवृष्टीमुळे भाजी कमी येत असल्यामुळे भाव वाढले आहेत. तर दलालांमुळे कृत्रिम तुटवडा होत असल्याच विक्रेत्यांच म्हणणं आहे.त्यामुळे काही गृहिणी त्रस्त झाल्या आहे. पावसाचं कारण असो की अजून काही भाज्यांच्या किंमती सतत महागत असल्यामुळे अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न सामान्यांना पडला आहेच

भाज्यांचे वाढलेले दर ..

गवार - ६० रु. किलो

भेंडी - ६० रु. किलो

फ्लॉवर - ६० रु. किलो

मटर - ८० रु. किलो

कोथिंबीर - ४० रु. जुडी

कांदा - ४५ रु. किलो

लसूण - १६० रु. किलो

First published: September 9, 2017, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading