मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुण्यात रात्रीस भाजी विक्रीचा खेळ चाले, पाहा हा VIDEO

पुण्यात रात्रीस भाजी विक्रीचा खेळ चाले, पाहा हा VIDEO

 'पुणे तिथे काय उणे..' असं उगाच म्हटलं जात नाही. पुणेरी माणसं कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढतील याचा काही नेम नाही.

'पुणे तिथे काय उणे..' असं उगाच म्हटलं जात नाही. पुणेरी माणसं कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढतील याचा काही नेम नाही.

'पुणे तिथे काय उणे..' असं उगाच म्हटलं जात नाही. पुणेरी माणसं कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढतील याचा काही नेम नाही.

पुणे, 26 एप्रिल : 'पुणे तिथे काय उणे..' असं उगाच म्हटलं जात नाही. पुणेरी माणसं कुठल्या गोष्टीवर कसा तोडगा काढतील याचा काही नेम नाही. पुण्यात कोरोनाने हाहाकार माजला आहे. परंतु, तरीही 'रात्रीस भाजी विक्रीचा खेळ चाले' असे प्रकार आता समोर आले आहे. पुण्यातल्या शिंदे आळी परिसरात रोज रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान भाजी विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. भाजी विक्रीचा व्हिडिओ समोर आला आहे. पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. कसबा परिसर सील करण्यात आला आहे. दिवसा भाजी खरेदीला गर्दी होते म्हणून आता रात्री भाजी विक्री केली जात आहे. भाजी विक्रेत्या महिला आणि पुरूष या परिसरात रस्त्यावर बिनधास्तपणे भाजी विक्री करतात. विशेष म्हणजे, पुणेकरही भाजी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं पाहण्यास मिळालं. हेही वाचा - 45 दिवसांनी लेकरं भेटली आईला, सुप्रिया सुळेंची अशीही मदत अशा पद्धतीने पुण्यात रात्री भाजी बाजार भरला जात आहे. पोलिसांनी रात्री गस्त जर घातली ही परिस्थिती दिसणार नाही. जर रात्री अशी गर्दी केली तर कोरोना आटोक्यात येणे शक्य नाही. धक्कादायक म्हणजे, कसबा पेठेत 100 हुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1184 वर दरम्यान, पुणे परिसरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, तरीही पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1184 इतकी झाली आहे. जिल्ह्यात एकूण 72 जण मृत्यूमुखी पडले असून एकट्या पुणे शहरात  शनिवारी 5 रुग्णांचा मृत्यू झाला तर दिवसभरात 90 रुग्ण वाढले होते. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या