मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'वेदांता' महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन, मोदींकडून मोठं आश्वासन

'वेदांता' महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन, मोदींकडून मोठं आश्वासन

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर, मुख्यमंत्री-पंतप्रधानांमध्ये चर्चा

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर, मुख्यमंत्री-पंतप्रधानांमध्ये चर्चा

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 14 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे, तर राज्य सरकारने तत्कालिन महाविकासआघाडी सरकारच्या उदासीन धोरणामुळे हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या वादामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली आहे. वेदांता-फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्राला दिला जाणार आहे. राज्यात आणखी एक मोठा प्रकल्प कोकणात येत आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

ही कंपनी दोन महिन्यात गेली नाही, एका वर्षात काय घडामोडी झाल्या. आरोप केले जात आहेत, पॅकेज दिल्याचे सांगितले जात आहे. विरोधक आपली पोळी भाजून घेत आहे, 7 जानेवरी 2020 ची बातमी आहे, तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले होते की फॉक्सकॉन कंपनी राज्यात येणार नाही, असा दावा सामंत यांनी केला.

'चार राज्य या प्रोजेक्टसाठी आग्रही होते. 39 हजार कोटीचे पॅकेज मविआने दिले होते असं बोललं गेलं होतं ते कुठेही दिले गेले नाही. जागा निश्चित करायची होती. वीज कमी दराने पाहिजे होती. 99 वर्षाच्या करारावर जागा पाहिजे होती पण 6 महिन्यात फक्त बैठका घेतल्या गेल्या ही कंपनी येणार नाही, हे जानेवारी 2020 मध्ये स्पष्ट झाले होते, असा खुलासा सामंत यांनी केला.

शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर फडणवीस यांनी विशेष बैठक घेतली आणि विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली. 38,831 कोटीचे पॅकेज देण्याचा निर्णय करण्यात आला. हा प्रकल्प गेला याचे खूप दुःख आहे. पण चांगले झाले तर विरोधकांमुळे आणि वाईट झाले तर शिंदे फडणवीस सरकारमुळे हे राजकारण दुर्दैव आहे,असंही सामंत म्हणाले.

First published:

Tags: Cm eknath shinde, PM narendra modi