Elec-widget

बारामतीत तोडफोड, प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते आक्रमक

बारामतीत तोडफोड, प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घेतल्यानंतर वंचितचे कार्यकर्ते आक्रमक

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

  • Share this:

बारामती, 6 ऑक्टोबर : 'आरे'तील वृक्षतोडीबाबत आंदोलनाप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर वंचितचे कार्यकर्ते राज्यभरात आक्रमक झाले आहेत. 'प्रकाश आंबडेकरांवर कारवाई करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध,' असं म्हणत बारामीत दोन एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील कारशेडविरोधातला सगळ्या याचिका फेटाळल्यानंतर लगेच मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील हजारो झाडांची अखेर रात्रीच्या कोळाखात कत्तल करण्यात आली. झाडांना वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी दिलेला लढा झाडांना जगवू शकला नाही. त्यामुळे आजवर मुंबईला श्वास देणाऱ्या झाडांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर मुंबईत विविध संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही या मुद्द्यावरून आंदोलन छेडलं. ज्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

जालन्यात कार्यकर्ते आक्रमक

आरे'च्या जंगलतोडी विरोधात रस्त्यावर उतरलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ आज जालन्यात निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनादरम्यान वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परीसर दणाणून सोडला. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी करत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अटकेचा निषेध केला.

अकोल्यात रस्तारोखो

Loading...

प्रकाश आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे अकोल्यातही पडसाद पाहायला मिळाले. प्रकाश आंबेडकर यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने अकोल्यातील अशोक वाटिका चौकात रास्ता रोको करून सरकारचे पुतळे जाळले.

SPECIAL REPORT : एक हिरवं गार 'शहर' तुमच्याकडे काही मागतंय, मी आरे बोलतोय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2019 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...