युतीतील गोंधळावर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, 'या' पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळण्याचा अंदाज

युतीतील गोंधळावर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, 'या' पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळण्याचा अंदाज

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि शिवसेनेत मोठा गोंधळ सुरू झाला आहे. मुख्यमंत्रिपद नेमकं कोणाकडे जाणार, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. या सगळ्या गोंधळाबद्दल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

'शिवसेना जेवढं ताणून धरेल तितका त्यांचा फायदा होईल. आता उद्धव ठाकरे किती ताणून धरतात त्यावरच सारं काही अवलंबून आहे. शिवसेना अडून राहिल्यास त्यांना मुख्यमंत्रिपद मिळेल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेना मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा खरंच तुटेपर्यंत ताणणार का, हे पाहावं लागेल.

अमित शहांनी काय दिला संदेश?

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेत चाललेला संघर्ष हा मुख्यमंत्रिपदासाठी नसून चांगली खाती मिळावीत यासाठी असल्याची माहिती आहे. नगर विकास, गृह यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांवर शिवसेनेनं दावा सांगितला आहे. म्हणूनच भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा तिढा सुटत नसतानाच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना संदेश पाठवला आहे.

सत्ता स्थापनेचं गणित सोडवण्यासाठी अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार होते. मात्र अचानक शहा यांचा हा दौरा रद्द झाला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी राज्य स्तरावर यातून मार्ग काढावा, असं अमित शहांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला कोणता नवा प्रस्ताव देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 01:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading