प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेलाही 'लोकसभा पॅटर्न', केली मोठी घोषणा

प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेलाही 'लोकसभा पॅटर्न', केली मोठी घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 9 सप्टेंबर : 'लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसबरोबर युती व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. पण 3 ते 4 महिने त्यांनी आम्हाला खेळवत ठेवलं. आताही काँग्रेसच्या वागणुकीत काही फरक पडलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेससोबत युती करणार नाही,' अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. आम्ही त्यांना प्रस्तावही दिला. मात्र त्या प्रस्तावाचं अजूनही उत्तर आलेलं नाही. आता आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्यात रस नाही,' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीच्या चर्चेची दारं बंद केली आहेत.

वंचितच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर

'आता आम्ही युतीच्या भानगडीत न अडकता आमची वाटचाल सुरू केली आहे. गणपती विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत,' अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दुसरीकडे युतीला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र एकत्रच लढणार आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा नारळ सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवाग्राम किंवा धुळ्यामधून फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस 138, राष्ट्रवादी 138, आणि 12 जागा मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मित्रपक्षांना सोबत घेण्यासाठी काँग्रेस आपल्या खात्यातील जागा सोडण्यास तयार आहे.

SPECIAL REPORT: दापोलीचा मतदारसंघात शिवसेना मंत्र्याचा मुलगा मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 12:41 PM IST

ताज्या बातम्या