'500 कोटी द्या मुख्यमंत्री होऊन दाखवतो', प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

'500 कोटी द्या मुख्यमंत्री होऊन दाखवतो', प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक वक्तव्य

प्रकाश आंबेडकर यांनी 'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्याला विरोध करत महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदला महाराष्ट्रातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी हिंसक वळणही मिळालं आहे. एकीकडे वंचितने हा महाराष्ट्र बंद पुकारला असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 'न्यूज 18 लोकमत'सोबत बोलताना एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

'मला तुम्ही 500 कोटी रुपये द्या...मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊन दाखवतो. ज्या दिवशी मतं विकत घेण्याची क्षमता माझ्याकडे येईल त्या दिवशी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल,' असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्या या नव्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. या निवडणुकीनंतर राज्यातील अनेक राजकीय समीकरणेही बदलली आहेत.

नक्की काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

'बदललेल्या समीकरणांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा स्थान मिळावं, यासाठी तुम्ही सीएए आणि एनआरसीचा मुद्दा समोर आणला आहे का?' असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता.  त्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'ज्या लोकांचं मी प्रतिनिधित्व करतो आणि ज्यांनी मला 50 लाख मते दिली त्यांचं संरक्षण करणं माझं काम आहे. निवडणूक जिंकणं न जिंकणं हा विषय नाही. तुम्ही 500 कोटी द्या मी मुख्यमंत्री होऊन दाखवतो. पण आम्ही प्रामाणिकपणे निवडणुका लढवतो. मतं विकत नाही,' असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज ठाकरेंनंतर आता राजू शेट्टीही सरकारविरोधात आक्रमक, ठाकरे सरकारवर साधला निशाणा

'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण

सीएए आणि एनआरसीच्या कायद्याला विरोध करत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सोलापुरात हिंसक वळण मिळालं आहे. सोलापुरातील बुधवार पेठ परिसरात सिटी बसच्या काचा फोडल्या आहेत.

सोलापूर शहरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असतानाच हिंसक वळणाने पोलीस सतर्क झाले आहेत. तोडफोड करण्यात आल्यानतंर घटनास्थळी पोलीसांची तुकडी दाखल झाली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

First published: January 24, 2020, 12:17 PM IST

ताज्या बातम्या