दागिने घालून फिरताय? सावधान, पुण्यात 11 महिलांची मंगळसूत्रं लंपास

दागिने घालून फिरताय? सावधान, पुण्यात 11 महिलांची मंगळसूत्रं लंपास

वटपौर्णिमेनिमित्त महिला दागिने घालून घराबाहेर पडणार हे समजल्यानंतर, सोनसाखळी चोरांनी अवघ्या दोन तासात 11 ठिकाणी हात साफ केलाय.

  • Share this:

वैभव सोनावणे, पुणे, 27 जून : 'वटपौर्णिमा जवळ आली आहे. जास्त भारी साडी आणि भरपूर सोनं घालून जाऊ नका. नाहीतर शेजारची बाई मनात म्हणेल, मला पुढच्या जन्मी हिचा नवरा मला मिळू दे.'

काल परवापर्यंत तुमच्या व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर आलेला हा जोक वाचून तुम्ही खो खो हसला देखील असाल.मात्र पुण्यातल्या सोनसाखळी चोरांसाठी हा मेसेज म्हणजे लॉटरी ठरलीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हेही वाचा

राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर एका व्यक्तीनं केला आत्महत्येचा प्रयत्न

मी पगडी काढणार नाही, विक्रम गोखलेंचा पवारांना टोला

सलमान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार का?

कारण वटपौर्णिमेनिमित्त महिला दागिने घालून घराबाहेर पडणार हे समजल्यानंतर, सोनसाखळी चोरांनी अवघ्या दोन तासात 11 ठिकाणी हात साफ केलाय.

पुण्यात 2 तासात 11 सोनसाखळी चोरीच्या घटना

लष्कर परिसरात - 1

शिवाजी नगरमध्ये - 1

सांगवीत - 4

वाकडमध्ये - 1

चतु:श्रृंगीत -2

भारती विद्यापीठ परिसरात -1

कोंढवा परिसरात -1

सकाळी सुमारे 8 ते साडे दहाच्या सुमारास लागोपाठ घटना घडल्यामुळे एकाच दुकलीचा या गुन्ह्यांमागे हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. वेगवेगळ्या घटनास्थळावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपलेल्या या फोटोंकडे बारकाईन पहा.

MH 12 DZ 2936 या क्रमांकाच्या स्प्लेंडर प्लस या मोटरसायकलवरून फिरणाऱ्या जोडगोळीनं महिलांच्या गळ्यातून दागिने हिसकवल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.तेव्हा ही मोटरसायकल कुठेही दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. तसंच दागिने घालून रस्त्यावरून फिरताना खबरदारी घ्या. आणि हो यापुढे आपला व्हॉट्सअप जोक गुन्हेगारांसाठी फायद्याचा ठरणार नाही ना याची देखील काळजी घ्या.

First published: June 27, 2018, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading