अशी बायको नको गं बाई! पत्नीनं पतीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी

एका दाम्पत्यामधील वाद इतका विकोपाला गेला की पत्नीनं थेट पतीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या महिलेनं पतीच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 07:25 PM IST

अशी बायको नको गं बाई! पत्नीनं पतीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी

वसई, 14 ऑगस्ट : एका दाम्पत्यामधील वाद इतका विकोपाला गेला की पत्नीनं थेट पतीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या महिलेनं पतीच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं. या घटनेत पती गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

वसईच्या उमेळमान येथील ही धक्कादायक घटना आहे. बाबीशन प्रदीप युरागुहायन (वय 32 वर्ष)असं जखमीचं नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी सिंथियाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट) रात्री ही घटना घडली आहे.

(वाचा : विकृतीचा कळस! गर्भवती तरुणीवर सामूहिक बलात्कार, 12 तासांत 11 वेळा केले अत्याचार)

या दोघांमध्ये मंगळवारी रात्री मोठं भांडण झालं. याच भांडणाचा राग मनात ठेवून पत्नीनं पतीच्या अंगावर उकळतं पाणी ओतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

(वाचा : बहीण-भावाच्या नात्याला काळिमा.. अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाचा अत्याचार)

Loading...

घरगुती भांडणात पत्नीला मारहाण करून पतीची आत्महत्या

दरम्यान काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एका पतीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  पती-पत्नीमधील शुल्लक भांडणात पतीने पत्नीला मारहाण केली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली होती. हे पाहून पतीनं पश्‍चातापातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन येथील ही घडली आहे. बीड शहरातील अशोक बाबूराव मस्के आणि त्यांच्या पत्नी किरण यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले होतं. भांडण अगदी विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला मारहाण केली. यात जखमी झालेल्या किरण मस्के यांना त्यांच्या मुलीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र इकडे घरी मारहाणीच्या पश्‍चातापातून अशोक बाबूराव मस्के (वय ६२) यांनी राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केली.  या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

असं धाडस करू नका, तलावात उडी मारणे तरुणाला पडले महागात, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 11:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...