मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोव्यातून कुरिअर बॉय म्हणून यायचे अन् घर साफ करुन जायचे; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

गोव्यातून कुरिअर बॉय म्हणून यायचे अन् घर साफ करुन जायचे; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

गोव्यातून कुरिअर बॉय म्हणून यायचे अन् घर साफ करुन जायचे; वसई पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

गोव्यातून कुरिअर बॉय म्हणून यायचे अन् घर साफ करुन जायचे; वसई पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

Maharashtra Crime News: वालीव पोलिसांनी चोरांच्या दोन टोळ्यांना अटक केली आहे जे कुरिअर बॉय म्हणून यायचे आणि चोरी करुन जायचे.

नालासोपारा, 22 मार्च : वसई विरारमध्ये गोव्यातून येवून चोरी (theft) करून पसार होणाऱ्या अट्टल चोरट्यांना मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाच्या वालीव पोलिसांनी (Valiv Police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या टोळ्यांच्या म्होरक्यासह 3 जणांना अटक (3 accused arrested) करून 16 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, असे असले तरी एक आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. वसईमधील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या बंद घरांना टार्गेटकरून अवघ्या काही मिनटांत घर साफ करून पोबारा करणाऱ्या टोळीने हैदोस घातला होता. त्यामुळे वसईत वाढत्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे साहजिक वालीव पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. वाढत्या घराफोडीला आळा घालण्यासाठी मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी त्याची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी आपल्या खबऱ्यांचे जाळ पसरवून चोरी झालेल्या ठिकाणच्या आसपासच्या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या परिसरात कोण कोण आले होते यांच्या तांत्रिक बाबी तपासून पाहिले असता एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे आरोपी हा चोरी झाल्या नंतर दर वेळी गोवा गाठत होता. वाचा : बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड एकाच विहिरीत मृतावस्थेत आढळले, हत्या की आत्महत्या? वालीव पोलिसांना पक्की खबर मिळताच पोलिसांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला तिथे गेल्यावर आरोपी रॉनी जोसेफ फर्नांडीस असल्याची पक्की खबर मिळाली होती. त्यानुसार गोव्यात पोलीस पोहचल्याची माहित रॉनी याला लागताच तो तेथून परागंदा झाला. त्याने पुन्हा मुंबई गाठली मात्र वालीव पोलीस त्याच्या मागावर होते अखेर त्याला वसईतील नायगावमध्ये जेरबंद करण्यात यश आले. असाच तापास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजून काही आरोपी मास लावून पाठीला बँग लावून कुणी कुरियर बॉय, तर कुणी प्लंबर असल्याचे सांगून बिल्डींगमध्ये प्रवेश मिळवायचे आणि बंद असणारे घर टार्गेट करून अवघ्या काही मिनिटात घर साफ करून निघून जायचे. ही सर्व करामत दुपारी लोक झोपल्या नंतर 4 ते 5 च्या सुमारास करायचे कुणी मुलांना शाळेत किंवा क्लासला आणण्यासाठी किंवा पोहोचवण्यासाठी गेले आहेत अशा नागरिकांना रेकी करून टार्गेट करायचे. आपलं काम फत्ते करून निघून जायचे. वाचा : 2 वर्षांच्या चिमुकल्याला 6 किलोमीटर फरफटत नेलं; सांगलीतील धक्कादायक प्रकार मात्र, हा खेळ त्यांचा वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हाणून पाडला आहे. कल्पेश किशन शिंदे वय 20,विशाल किसन मंडल वय 20, वारीस वलीमोहम्मद खान वय 26, सूरज उर्फ उस्मान मुक्तार खान वय 22, रॉनी जोसेफ फर्नांडीस यांना अटक करुन त्यांच्याकडून चोरून नेलेले सोन्या चांदीचे दागिने, मोटरसायकल मोबाइल असा एकूण 3,91,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अद्याप मुंबई, पालघर, वापी, कासारवडवलीसह इतर भागात 35 गुन्ह्यांची नोंद असणाऱ्या रॉनी जोसेफ फर्नांडीस याचा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
First published:

Tags: Crime news, Vasai, Vasai virar

पुढील बातम्या