ड्रायव्हरची एक चूक आणि ST बसने दिली टँकरला जोरदार धडक, 12 प्रवाशी जखमी

ड्रायव्हरची एक चूक आणि ST बसने दिली टँकरला जोरदार धडक, 12 प्रवाशी जखमी

एका महिला प्रवाशाची प्रकृती गंभीर असून तिला वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Share this:

वसई, 23 फेब्रुवारी : वसईतील चिंचोटी फाटा येथे एसटी बसला अपघात झाला असून 12 प्रवाशी जखमी झाले आहेत. एका महिला प्रवाशाची प्रकृती गंभीर असून तिला वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यावरून स्वारगेट ठाणे- वसई एसटी बसने समोरून चालणाऱ्या ऑईल टॅकरला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला.

स्वारगेटहून ठाण्याच्या दिशेने वसईतील चिंचोटी फाटा येथे एसटी बस 1.15 च्या दरम्यान आली. त्यावेळी एसटी चालक डोळे चोळत असताना अचानक ऑईल टॅकरला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे बसमधील 12 प्रवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जेवण बनविण्यावरून भांडण, ट्रक ड्रायव्हरने केला क्लिनरचा खून

ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये बसचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच धडक दिलेल्या ऑईल टँकरमधील ऑईल रस्त्यावर पडले असून वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातात संगीता पठारे यांच्या डोक्याला मार बसला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एसटी अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: vasai
First Published: Feb 23, 2020 06:21 PM IST

ताज्या बातम्या