मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लग्नाचे आमिष देऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, 5 महिन्याची गरोदर झाल्याचे कळताच काढला पळ, पण...

लग्नाचे आमिष देऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, 5 महिन्याची गरोदर झाल्याचे कळताच काढला पळ, पण...

वेशांतर करून लोहमार्ग पोलिसांनी सलग तीन-चार दिवस सापळा लावून पांडेच्या मुसक्या आवळल्या.

वेशांतर करून लोहमार्ग पोलिसांनी सलग तीन-चार दिवस सापळा लावून पांडेच्या मुसक्या आवळल्या.

वेशांतर करून लोहमार्ग पोलिसांनी सलग तीन-चार दिवस सापळा लावून पांडेच्या मुसक्या आवळल्या.

वसई, 12 ऑक्टोबर :  लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि  वारंवार शरीर संबंध ठेवल्याने तरुणी पाच महिन्यांची गरोदर (5 months pregnant) राहिली. अखेर तरुणीच्या तक्रारीवरुन वसई लोहमार्ग पोलिसांनी (vasai police) या नराधमाला तेलंगणा (Telangana ) येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई रोड रेल्वे स्थानकाबाहेर फळे विकून 21 वर्षीय तरुणी कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होती. फळे विकताना डिसेंबर 2020 महिन्यात तरुणीची ओळख शेष प्रसाद ऊर्फ दीपू हिरालाल पांडे याच्याशी झाली. पांडे हा रेल्वे स्थानकात हमालीचे काम करून वसई रोड स्थानकातच राहायचा. रोजच्या गाठीभेटीतून पांडे याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

पुणे हादरलं, एकतर्फी प्रेमातून 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा कोयत्याने चिरला गळा

त्यानंतर तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्तापित केले. लग्न करण्याच्या नावाखाली सतत शरीरसंबंध ठेवल्याने तरुणी गरोदर राहिली. पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचे लक्षात येताच तरुणीचे कुटुंबीय हादरले. पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी तात्काळ वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. घडलेला प्रसंग लोहमार्ग पोलिसांना सांगितला.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच पांडे याने पळ काढला व मोबाईल क्रमांकही बंद केला. तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांचे पथक पांडे याच्या मुळगावी मध्य प्रदेश येथे दाखल झाले. तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता पांडे हा तेलंगणा राज्यात असल्याचे लोहमार्ग पोलिसांना समजले.

Shocking! GF भेटणार म्हणून चढला जोश; तरुणाने आपला प्रायव्हेट पार्ट गमावला

लोहमार्ग पोलिसांचे पथक हैदराबादला रवाना झाले. वेशांतर करून लोहमार्ग पोलिसांनी सलग तीन-चार दिवस सापळा लावून पांडेच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक केल्यानंतर वसईत आणण्यात आले असून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Rape