गावी जाताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, वसईत घडली घटना

गावी जाताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, वसईत घडली घटना

मायगावी परतण्यासाठी वसईच्या सनसिटी मैदानावर जमलेल्या हजारो मजुरांच्या ट्रेनमधून जाण्यासाठी विधोतमा शुक्ला आणि त्यांचा परिवार आला होता.

  • Share this:

वसई, 29 मे : मायगावी परतण्याचा प्रतीक्षेत असलेल्या 57 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वसईच्या सनसिटी मैदानावर घडली आहे. शासनाकडून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची सोय करण्याकरता ट्रेन सोडण्यात येत आहे. मात्र त्या ट्रेनचा बिगर मजूरही फायदा घेत असल्याचं समोर येत आहे. कोणताही मेसेज आला नसताना आपल्या मायगावी परतण्यासाठी वसईच्या सनसिटी मैदानावर जमलेल्या हजारो मजुरांच्या ट्रेनमधून जाण्यासाठी विधोतमा शुक्ला आणि त्यांचा परिवार आला होता. दरम्यान, त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुधवारी ही घटना घडली आहे.

नालासोपारा येथे राहणारे विनय शुक्ला हे आपलीपत्नी आई व मुलांसह उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथे जाण्यासाठी मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सनसिटी मैदानात आले होते. दोन वाजेपर्यंत हे कुटुंब ट्रेनच्या प्रतीक्षेत बसले होते. दरम्यान विधोतमा यांना डायबेटीस व ब्लडप्रेशरचा त्रास असल्याने कडक उन्हामुळें अस्वस्थ वाटून त्या जागीच बेशुद्ध झाल्या.

बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विधोतमा यांना रुग्णवाहिकेतून वसईच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वी डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषीत केले. वसईच्या सनसिटी ग्राऊंडवर मजुरांना उत्तर भारतात जाण्यासाठी ट्रेन सोडल्या जात असल्या तरी त्या ट्रेनमध्ये जाण्यासाठी कोणताही मेसेज व मजूर नसताना त्याचा लाभ घेताना दिसत आहेत.

हेही वाचा : प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं ‘COVID-19’मुळे निधन

कोणतीही ट्रेन नसताना सुद्धा या ठिकाणी बुधवारी पहाटे पासून मेसेज नसताना गर्दी केली होती. पोलीस व पालिका यांच्या माध्यमातून जमलेल्या मजूरांना त्यांच्या राहत्या घरी रिक्षा व बसने पुन्हा मोफत सोडण्यात आले.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 29, 2020, 10:28 PM IST

ताज्या बातम्या