ताई फोनवर जास्त बोलते म्हणून लहान भावाने केली गळा आवळून हत्या

ताई फोनवर जास्त बोलते म्हणून लहान भावाने केली गळा आवळून हत्या

बहिण मोबाईलवर जास्त बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होते याचा राग धरून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन भावाने आपल्या मोठ्या बहिणीची घरात निर्घृण खून केला

  • Share this:

वसई, 28 आॅगस्ट : बहिण मोबाईलवर जास्त बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होते याचा राग धरून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन भावाने आपल्या मोठ्या बहिणीची घरात निर्घृण खून केल्याची घटना वसईत घडलीये.

वसईत सख्या लहान अल्पवयीन भावानेच मोठ्या बहिणीची गळा आवळून हत्या केली आहे. बहीण मित्रासोबत जास्त फोनवर जास्तवेळ बोलते, त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून हत्या केली असल्याचं उघड झालं आहे.

वसईतील पाळणापाडा येथील दुमडा चाळीत रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली आहे. काजल पगारे असं हत्या झालेल्या बहिणीचे नाव असून ती 18 वर्षांची आहे. तर हत्या करणारा आरोपी भाऊ हा 17 वर्षांचा आहे. आरोपी विरोधात वालीव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, करोडोंच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

First published: August 28, 2018, 5:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading