मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरेंची मंत्री मंडळात वर्णी लागल्यानं वरूण सरदेसाई यांची युवा सेना प्रमुखपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा

आदित्य ठाकरेंची मंत्री मंडळात वर्णी लागल्यानं वरूण सरदेसाई यांची युवा सेना प्रमुखपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा

'मुलं अभ्यास करून परत गेले तर त्यांचा जीव धोक्यात आहे. अफगाणिस्तानात वीज पुरवठा बंद झालाय. माझा कुटुंबियांशी गेल्याकाही दिवसांपासून संपर्क झालेला नाही'

'मुलं अभ्यास करून परत गेले तर त्यांचा जीव धोक्यात आहे. अफगाणिस्तानात वीज पुरवठा बंद झालाय. माझा कुटुंबियांशी गेल्याकाही दिवसांपासून संपर्क झालेला नाही'

Yuva Sena chief: युवासेनेला लवकरच नवा प्रमुख मिळणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.

नाशिक, 06 ऑगस्ट: शिवसेनेच्या (Shivsena) युवासेनेला (YuvaSena) लवकरच नवा प्रमुख मिळणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर ते सध्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे युवासेना प्रमुखपदी आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. सध्या वरुण सरदेसाई बरेच सक्रिय झाले आहे. कालपासून ते उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.

युवा संवाद मेळाव्यासाठी वरुण सरदेसाई जळगाव पासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. जळगाव, नंदुरबार, मालेगाव, नाशिक या ठिकाणी ते संवाद मेळावा घेणार आहेत. तसंच उद्या त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे. मराठवाडा, विदर्भानंतर वरुण सरदेसाई उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

अदार पूनावालांची मोठी घोषणा, Covishield घेतलेल्या विद्यार्थ्यांना सीरमकडून गिफ्ट

येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. जर युवासेनेचं प्रमुखपद वरुण सरदेसाईंकडे गेलं तर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबाबाहेर इतरांना महत्वाचे पद मिळेल.

वरुण सरदेसाई यांची थोडक्यात ओळख

29 वर्षीय वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहे. पेशाने ते सिव्हिल इंजिनिअर आहेत. वरुण सरदेसाई यांना आदित्य ठाकरेंचा विश्वासू सहकारी असंही म्हटलं जातं. युवासेनेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा भाग असल्याचंही म्हटलं जातं.

First published:
top videos

    Tags: Aaditya thackeray, Shiv sena