मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लॉकडाऊननंतर नोकरीच्या शोधात आहात? इथे सुरू आहे विविध पदांची भरती

लॉकडाऊननंतर नोकरीच्या शोधात आहात? इथे सुरू आहे विविध पदांची भरती

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती करण्यात येत आहे.

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती करण्यात येत आहे.

राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती करण्यात येत आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 20 डिसेंबर : चांगलं शिक्षण घेऊनही वाढत्या स्पर्धेमुळे लवकर नोकरी मिळवणे तरुणांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी भरती सुरू होणं ही सद्यस्थितीत तरुणांसाठी आनंदवार्ताच ठरते. अशातच राज्य पाणी व स्वच्छता मिशनमध्ये सेवा तत्त्वावर विविध पदांची भरती करण्यात येत आहे. 1. पदाचे नाव :- समन्वयक- मनुष्यबळ विकास (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून एम.बी.ए (एचआर) किंवा एम.बी.ए. (पर्सनल मॅनेजमेंट) किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव 2 . पदाचे नाव :- समन्वयक – माहिती, शिक्षण व संवाद (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / एमबीए मधील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव 3 . पदाचे नाव :- संनियंत्रण व मूल्यमापन समन्वयक (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र या सारख्या विकास क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत उत्त्तीर्ण. अनुभव – संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव 4 . सहायक मनुष्यबळ आस्थापना सल्लागार (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील मानव संसाधन व्यवस्थापन किंवा सामाजिक शास्त्र विषयातील पदवी. अनुभव – संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव 5 . सहायक स्वच्छता व आरोग्य सल्लागार (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.एस्सी (झूलॉजी/ मायक्रो बायोलॉजी / हेल्थ स्टडीज) अनुभव – संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव 6 . व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील एम.सी.ए. किंवा एम.एस्सी (कॉम्प्युटर सायन्स) किंवा सांख्यिकी मधील पदव्युत्तर पदवी. अनुभव – संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव 7. समन्वयक – पाणी गुणवत्ता (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातील बी.टेक./बी.ई. (केमीकल इंजिनीअरींग) किंवा एन्वायरलमेंटल इंजिनीअरींग / एम.एस्सी. (केमिस्ट्री/ एन्वायरलमेंटल सायन्स/मायक्रोबायोलॉजी). अनुभव – संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव 8. माहिती विश्लेषक – पाणी गुणवत्ता (जागा – 1) शैक्षणिक पात्रता – एम.एस्सी (स्टॅटीस्टीक्स / केमिस्ट्री /एन्वायरलमेंटल/मायक्रोबायोलॉजी) अनुभव – संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव 9. विभागीय समन्वयक (जागा – 3) शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (ग्रामीण व्यवस्थापन) / एमएसडब्ल्यू / एमए (सामाजिक विज्ञान – समाजशास्त्र, मास कम्युनिकेशन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन किंवा समकक्ष) अनुभव – संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांचा अनुभव वयोमर्यादा – दि.1 डिसेंबर, 2020 रोजी किमान 21 वर्षे व कमाल 55 वर्षे अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – 21 डिसेंबर 2020 दुपारी 12.00 वाजेपर्यंत अधिक माहितीसाठी – http://maharashtra.gov.in (Rojgar) व http://wsso.in
First published:

Tags: Job

पुढील बातम्या