VIDEO 'वंदे मातरम्' हे इस्लाम विरोधी, घोषणा देणार नाही'

VIDEO 'वंदे मातरम्' हे इस्लाम विरोधी, घोषणा देणार नाही'

समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातले खासदार शफीकुर रहेमान बर्क हे शपथ घेत असताना 'वंदे मातरम् 'च्या घोषणा दिल्या गेल्या.

  • Share this:

नवी दिल्ली 18 जून : 17 व्या लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. लोकसभा नवीन असल्याने सुरुवातीला सर्व सदस्यांचा शपथविधी सध्या सुरू आहे. पहिल्या दिवशी 300 पेक्षा जास्त सदस्यांनी शपथ घेतली. आज दुसऱ्या दिवशीही सदस्यांचा शपथ घेण्याचा क्रम सुरूच होता. प्रत्येक सदस्याची शपथ घेण्याची तऱ्हा ही वेगळी असते. अनेक सदस्यांनी आपल्या मातृभाषेत आणि राज्याच्या वेशभुषेत शपथ घेतली. अनेकांनी वेगवेळ्या घोषणा दिल्या. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातले खासदार शफीकुर रहेमान बर्क हे शपथ घेत असताना 'वंदे मातरम् 'च्या घोषणा दिल्या गेल्या. बर्क यांनी त्या घोषणांना आक्षेप घेत आपण अशी घोषणा देणार नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, वंदे मातरम् म्हणणं हे इस्लामविरोधी आहे. त्यामुळे मी ते म्हणणार नाही.

ओवेसींच्या शपथविधीवेळीही घोषणाबाजी

MIMचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतली. ओवेसी शपथ घेण्यासाठी येत असतानाच भाजपच्या सदस्यांनी भारत 'माती की जय' आणि 'वंदे मातरम'चे नारे लावले. भाजपच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू असताना ओवेसी यांनीही हातवारे करत आणखी मोठ्याने घोषणा द्या, असं हातानेच सुचवलं. त्यांनी उर्दुतून आणि 'खुदा'ला स्मरून शपथ घेतली. शपथ झाल्यावर त्यांनी, जय भीम, तकबीर, अल्ला हु अकबर आणि जय हिंद अशी घोषणा दिली. ओवेसी हे सभागृहात बोलत असताना अतिशय आक्रमकपणे आपली मतं मांडतात. त्यांच्या बोलण्यामुळे वादही निर्माण होतात. भाजप आणि शिवसेनेचे सदस्य हे कायम त्यांना टोकण्याचा प्रयत्न करत असतात.

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे बिर्ला

भारतीय जनता पक्षाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. ओम बिर्ला लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी NDAचे उमेदवार आहेत. ओम बिर्ला हे राजस्थानमधील कोटा येथील खासदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह, रमापती राम त्रिपाठी, एस. एस. अहलूवालिया आणि डॉ. वीरेंद्र कुमार या नेत्यांची नावं देखील लोकसभेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होती. पण, या सर्वांची नावे आता मागे पडली असून ओम बिर्ला अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावर बुधवारी ( उद्या ) संसदेमध्ये मतदान होईल. लोकसभेत एनडीएचे बहुमत असल्याने ओम बिर्ला लोकसभा अध्यक्ष होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

First published: June 18, 2019, 5:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading