'आज काचा फोडल्या, उद्या जाळून टाकेन', 'वंचित'च्या नेत्याची मजुरांवर दादागिरी, पाहा VIDEO

'आज काचा फोडल्या, उद्या जाळून टाकेन', 'वंचित'च्या नेत्याची मजुरांवर दादागिरी, पाहा VIDEO

बीड जिल्ह्यातील धारूर घाटात गुरूवारी रात्री हा प्रकार घडला. सध्या ऊसतोड मजूर, मुकादम यांचा संप सुरू आहे.

  • Share this:

बीड, 02 ऑक्टोबर : बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीची पदाधिकाऱ्यांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. कारखान्याला जाणाऱ्या मजुरांना अडवून गाडीची तोडफोड करण्यात आली आणि चालकाला मारहाण करण्यात आली. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

बीड जिल्ह्यातील धारूरच्या घाटात मध्यरात्री ही  घटना घडली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा शब्द मोडल्याने पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी घाटात कारखान्याला जाणाऱ्या गाड्या अडवल्या आणि तोडफोड केली.  वंचितचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर आणि पदाधिकारी या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये हातात कोयता घेऊन गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. 'आज फक्त काचा फोडल्या आहे, उद्या गाड्या जाळून टाकू' अशी धमकीच बांगर यांनी मजुरांना दिली.

बीड जिल्ह्यातील धारूर घाटात गुरूवारी रात्री हा प्रकार घडला. सध्या ऊसतोड मजूर, मुकादम यांचा संप सुरू आहे. जोपर्यंत वाढीव मजुरी भाव मिळणार नाही तोपर्यंत ऊसतोड मजूर कारखान्याला पाठविणार नाही. असा पवित्रा ऊसतोड मजूर संघटनेने घेतला आहे. मजुरांच्या या संपात वंचित बहुजन आघाडी देखील उतरली आहे.

'आमचे ब्लाउज ओढले, खासदारांना खाली पाडले', उत्तर प्रदेश पोलिसांचा आणखी एक प्रताप

वंचित नेते प्रकाश आबेडकरांनी देखील या संपात उडी घेतली आहे. काही मजूर मध्यरात्री कारखान्याला जात होते. तेव्हा शिवराज बांगर यांनी दादागिरी केली. आंबेडकर यांचा शब्द मोडल्याचे सांगत मजुरांना अश्लील शिवीगाळ करत त्यांना मारहाण केलीय

तसंच  मजुरांच्या गाड्याचीही तोडफोड करण्यात आली. मजुरांना मारहाण झाल्याने हा संप चिघळणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. कायद्याची भाषा करणारे प्रकाश आंबेडकर यांच्याच पदाधिऱ्यांकडून कायदा हातात. घेऊन मजुरांना मारहाण केल्याने कारवाईची मागणी होत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 2, 2020, 3:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या