'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, सोलापूरमध्ये बसच्या काचा फोडल्या

'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, सोलापूरमध्ये बसच्या काचा फोडल्या

सोलापुरातील बुधवार पेठ परिसरात सिटी बसच्या काचा फोडल्या आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, सोलापूर, 24 जानेवारी : सीएए आणि एनआरसीच्या कायद्याला विरोध करत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सोलापुरात हिंसक वळण मिळालं आहे. सोलापुरातील बुधवार पेठ परिसरात सिटी बसच्या काचा फोडल्या आहेत.

सोलापूर शहरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळत असतानाच हिंसक वळणाने पोलीस सतर्क झाले आहेत. तोडफोड करण्यात आल्यानतंर घटनास्थळी पोलीसांची तुकडी दाखल झाली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. पुन्हा अशा घटना घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

वंचितच्या बंदला महाराष्ट्रात कुठे कसा प्रतिसाद?

बारामती

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बारामतीकरांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आहे. शहरातील बहुतांशी बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या आहेत.

वर्धा

वंचित बहुजन आघाडीने एनआरसी व सिएए विरोधात पुकारलेल्या राज्यस्तरीय बंदला जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. शहरातील एसटी, पेट्रोल, शाळा - महाविद्यालय सुरळीत चालू असून सद्यातरी बंदचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. विशेष म्हणजे वर्ध्यात शुक्रवारी मार्केट बंद राहत असल्याने दुकाने अद्यापही उघडले नसल्याचे चित्र असले तरी जनजीवन सुरळीत आहे.

मनमाड

वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये बाजार समितीदेखील सहभागी झाली आहे. लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांची झाली मोठी गैरसोय

अकोला

CAA / NRC विरोधातील राज्यव्यापी बंदला अकोला शहरात अल्प प्रतिसाद, तर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परीक्षा सुरू असल्याने, शाळा महाविद्यालय बंद नाहीत.

शिर्डी

वंचितने पुकारलेल्या बंदचा शिर्डीत कोणताही परीणाम दिसत नाही. साईमंदिरात भक्तांची गर्दी कायम असून दर्शनरांगा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. साईसंस्थानचे भक्तनिवास, प्रसादालय, रूग्णालयाबरोबरच शाळा कॉलेज सुरळितपणे सुरू आहे. शहरातील शेकडो हॉटेल्स, फुल प्रसादाची दुकाने प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू असल्याने वंचितने पुकारलेल्या बंदचा शिर्डीत कोणताही परीणाम दिसत नाही.

कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रामध्येही आजच्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत नाही. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत आहे.

First published: January 24, 2020, 11:23 AM IST

ताज्या बातम्या