'आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच!'

प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील माने यांनी केली आहे. माने यांना वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 06:00 PM IST

'आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच!'

पुणे, 4 जुलै- वंचित बहुजन आघाडीमुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपलाच फायदा झाला. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली असल्याचा आरोप वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील माने यांनी केली आहे. माने यांना वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा मागणाऱ्या लक्ष्मण मानेंचा बोलविता धनी वेगळाच, असल्याचा टोला पडळकरांनी लगावला आहे. '

मी भाजपमध्ये होतो हे जगजाहीर आहे. आरएसएसशी माझे संबंध होते. भिडे गुरुजींशी माझे संबंध होते, या सगळ्यांची उत्तरे मी याआधीच दिली आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांचा राजीनामा मागणारे लक्ष्मण माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. मानेंचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकीय पटलावर चर्चेत आलेली वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याचं समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर आक्षेप घेत प्रकाश आंबेडकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. या आरोपावर उत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, मी भाजपात होतो हे जगजाहीर आहे. आरएसएसशी माझे संबंध होते.  भिडे गुरुजींशी माझे संबंध होते या सगळ्याची उत्तर मी याआधीच दिली आहे.

मानेंच्या आरोपांवर काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडीत येताना हा सगळा खुलासा करूनच मी आलो आहे. महासचिवपदावर माझी निवड होणार याची कल्पनाही मला नव्हती. बैठकीत लक्ष्मण माने यांनीच माझे नाव सुचवले होते. लक्ष्मण माने यांना माझ्याबाबत काही आक्षेप असतील तर ते अध्यक्षांकडे मांडावेत. तसेच लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या चार बैठका झाल्या. या बैठकीत लक्ष्मण माने यांनी आक्षेप घेतले नाही मग निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माने आताच आक्षेप का घेत आहेत? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

Loading...

प्रदेशाध्यक्षपद मिळत नसल्याने माने नाराज..

प्रदेशाध्यक्षपद मिळत नसल्याने लक्ष्मण माने नाराज आहेत. लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादीशी संबंध आहे, ते त्यांची भाषा ते बोलत आहेत. माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे असा आरोप पडळकरांनी केला आहे.

लक्ष्मण माने यांनी आरएसएस आणि भाजपाच्या लोकांनी वंचित आघाडी व्यापून टाकली आहे त्यामुळे ही आघाडी बहुजनांची नसून उच्चवर्णीयांची झाली आहे असा आरोप करत प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर यांची वंचित बहुजन आघाडीच्या महासचिवपदी नियुक्ती केली आहे.

काय आहे लक्ष्मण माने यांचे आरोप?

'लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे भाजपला 10 मिळाला. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे प्रतिगामी शक्तींचाच फायदा होत आहे. आता विधानसभा निवडणुकीतही आंबेडकर तीच भूमिका घेऊन पुढे चालले आहेत. हा पक्ष आता वंचितांचा राहिला नसून त्यामध्ये आरएसएसच्या लोकांनीच घुसखोरी केली आहे,' असं म्हणत लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना लक्ष्मण माने यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 'पक्ष उभा करण्यासाठी आम्हीही परिश्रम घेतले आहेत. आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आम्ही हा पक्ष नव्याने उभा करू. आमची वेगळी वाटचाल करू. प्रकाश आंबेडकरांनी आमचा वापर केला. त्यांच्याद्वारे अजूनही भारिपचं काम सुरू आहे,' असा आरोप लक्ष्मण मानेंनी केला आहे.

विधानसभेसाठी काय आहे वंचितची भूमिका?

'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचित आघाडीच्या या भूमिकेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे.

'वंचितसोबत आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचे नेते त्यावर चर्चा करतील. पण वंचितने दिलेली ऑफर म्हणजे भाजपला मदत करायची आहे का? असा प्रश्न पडतो. वंचित आमच्यासोबत आली नाही तर जनता ठरवेल की वंचित नेमकी कुणाची बी टीम आहे,' असं म्हणत काँग्रेस नेते आणि विधानसभेची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वंचितच्या या फॉर्म्युल्यामुळे काँग्रेस मात्र चांगलीच अडचणीत सापडली आहे. कारण पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत असलेल्या वंचित आघाडीने थेट 248 जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. तर काँग्रेसने फक्त 40 जागा लढवाव्यात, असं वंचितचं म्हणणं आहे.

प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करणारे लक्ष्मण माने करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2019 06:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...