वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का, या नेत्याने दिला राजीनामा

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का, या नेत्याने दिला राजीनामा

वंचित बहुजन आघाडीमधून MIM बाहेर पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचितला आणखी एक धक्का बसलाय.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीमधून MIM बाहेर पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचितला आणखी एक धक्का बसलाय. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय.

भाजपमध्ये प्रवेश करणार?

गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. ते काही दिवसांतच भाजपमध्ये प्रवेश करणार, असं बोललं जातंय. ते भाजपच्या तिकिटावर जत किंवा खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची चर्चा होतीच आणि झालंच तसंच. पुढच्या दोन दिवसांत आपण आपली राजकीय भूमिका जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा : छगन भुजबळांचे पाय आणखीन खोलात, सुधारित कलमांमुळे अडचणी वाढल्या)

लोकसभा निवडणुकीसाठी गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे सांगलीमधून उमेदवारी देण्यात आली होती. इथे भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत झाली.

लोकसभा निवडणुकीत पराभव

सांगलीमध्ये भाजपचे संजयकाका पाटील आणि स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं. संजयकाका पाटील यांना 5 लाख 8 हजार मतं मिळाली. यामध्ये ते विजयी झाले. गोपीचंद पडळकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता गोपीचंद पडळकर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. या निवडणुकीत ते भाजपतून लढले तर जत किंवा खानापूरमधली राजकीय समीकरणं बदलू शकतात.

============================================================================================

VIDEO : पाण्यात अडकलेल्या चिमुकल्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: September 26, 2019, 3:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading