Home /News /maharashtra /

''हवेत बोलू नये, तुम्ही तयार रहा!'', चंद्रकांत खैरेंना वंचितचा इशारा

''हवेत बोलू नये, तुम्ही तयार रहा!'', चंद्रकांत खैरेंना वंचितचा इशारा

चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. यावर आता वंचितनं इशारा दिला आहे.

    मुंबई, 29 मे: शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार (Senior Shiv Sena leader and former MP) चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. खैरे यांनी केलेल्या आरोपावर वंचित बहुजन आघाडीनं उत्तर दिलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद (Farooq Ahmed) यांनी खैरे यांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे. खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार असून खैरेंनी तयार राहावे, असा इशारा फारुख अहमद यांनी दिला आहे. काय म्हणाले फारुख अहमद खैरेंना बोलण्याचा स्वातंत्र्य असलं तरीही त्यांनी इतरांवर आरोप करताना विचारपूर्वक बोलावे. जर खैरे यांच्याकडे पैसे दिल्याचे किंवा घेतल्याचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. ते सत्तेत आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यामुळे सर्व तपास यंत्रणा त्यांच्या हातात असताना असे बिनबुडाचे आरोप खैरे करत आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेनेच्या नेत्याने असेच आरोप केले होते, पुढे त्याला माफी मागत फिरावे लागलं. चेहऱ्यावर हळद लावत असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवा; नंतर साईड इफेक्ट वाढतात  खैरेंनी हवेत बोलू नये. बोलण्याचे स्वातंत्र्य असले तरी दुसर्‍यांवर आरोप करताना विचार पूर्वक बोलले पाहीजे, आरोप करताना पुरावे देणेही आवश्यक असते. भाजपच्या कुठल्या नेत्याने आणि कुठे पैसे दिले त्याचे पुरावे द्या. वंचित बहुजन आघाडीचे चारित्र्य स्वच्छ आहे. खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी कोर्टात गेल्या शिवाय रहाणार नाही. पुराव्या शिवाय आरोप करणारांनी डीफेमेशनच्या केसला तयार रहावे. भ्रष्टाचाराच्या आरोपातून हे स्वतःच्याच नेत्यांना वाचवू शकत नाहीत, यांच्या नेत्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. खरे तर तुमची ही धडपड तुमच्या नेत्यांना वाचवण्या साठी आहे. त्या विषयावर कोर्टात गेलो तर तुमच्या नेत्यांना कोणी वाचवू शकणार नाही हे लक्षात ठेवा. खैरे आता तयार रहावे स्वच्छ चारित्र्य असलेल्या वंचित बहुजन आघाडीवर शिंतोडे उडवण्याचे काम करत आहे. त्यामुळे खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात गेल्या शिवाय रहाणार नाही. पुराव्या शिवाय आरोप करणाऱ्यांनी डीफेमेशनच्या याचिकेसाठी आता तयार रहावे, असा इशारा अहमद यांनी दिला आहे. चंद्रकांत खैरे यांनी काय केला होता आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. नारळ पाण्याला उगीच म्हणत नाहीत अमृत! उन्हाळ्यात आरोग्यासाठी आहेत इतके सगळे फायदे तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि MIM ला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे, असं खैरे यांनी म्हटलं होतं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Shivsena

    पुढील बातम्या