• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • वंचित बहुजन आघाडीला धक्का, धनगर समाजाचे सुरेश कांबळे हातात बांधणार घड्याळ

वंचित बहुजन आघाडीला धक्का, धनगर समाजाचे सुरेश कांबळे हातात बांधणार घड्याळ

वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) धक्का उस्मानाबादमध्ये (Osmanabad) जबरदस्त धक्का बसला आहे.

 • Share this:
  उस्मानाबाद, 13 सप्टेंबर: वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) धक्का उस्मानाबादमध्ये (Osmanabad) जबरदस्त धक्का बसला आहे. मल्हार आर्मीचे प्रमुख आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे नेते सुरेश कांबळे (Suresh Kamble) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) प्रवेश करणार आहेत. येत्या 16 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. सुरेश कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून भुम परंडा वाशी मतदार संघात तानाजी सावंत आणि राहुल मोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. काल भूममध्ये कार्यकर्ता मेळावा घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. ''भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पैशांची दिली होती ऑफर'' आमदाराचं खळबळजनक विधान साताऱ्यात शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकांनी हातात बांधलं घड्याळ साताऱ्यात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शशिकांत वाईकर हे शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), दीपक पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे. खास महिलांसाठी LIC 'ही' पॉलिसी,  जी देते लाखोंचा लाभ लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर ही NCP मध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Surekha Punekar) अधिकृत प्रवेश करणार आहे. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीत सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश करतील.
  Published by:Pooja Vichare
  First published: