महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारी बातमी; MIMने वंचितला दिला 'तलाक'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलणारी बातमी; MIMने वंचितला दिला 'तलाक'

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यावर आपण फक्त ओवेसी यांच्याशी बोलू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीतून अखेर MIM बाहेर पडलं आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या निर्णयावर असादुद्दीन ओवेसी यांनी शिक्कामोर्तब केला आहे. जलील यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या वैयक्तिक निर्णय नसून तो पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी MIM आणि भारिपचा काडीमोड झाला आहे. विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी फूट पडली आहे. जागावाटपावरून प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर नाराज होऊन या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढत आपली भूमिका जाहीर केली होती. त्यावर आपण फक्त ओवेसी यांच्याशी बोलू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. 'आमची एमआयएमसोबत युती महाराष्ट्राच्या नेत्यांशी झाली नाही तर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत झाली आहे. त्यांची माणसे हैदराबादवरून आमच्याकडे आली आणि ते आता निरोप घेऊन ओवेसींकडे गेली आहेत. याविषयी जोपर्यंत ओवेसी काही स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमची युती कायम आहे,' असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं होतं.

महत्त्वाची बातमी - अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेसचा 'हात' सोडला; पक्ष सोडत आहे कारण...

त्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी यांनीही जलील यांचा निर्णय अंतिम असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून MIM बाहेर पडलं आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि MIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यात जागावाटपावरून मतभेद झाल्यामुळे MIM  ने हा निर्णय घेतला आहे.

जागावाटपाबद्दल MIM चा सन्मान ठेवला गेला नाही, असं इम्तियाज जलील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं होतं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात महत्त्वाची राजकीय बातमी आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे वेगळी समीकरणं ठरणार होती. पण आता MIM बाहेर पडल्यामुळे पुन्हा एकदा ही समीकरणं बदलू शकतात. MIM ने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.

इतर बातम्या - शरद पवार दैवत पण..., आणखी एक राष्ट्रवादी आमदार शिवसेनेच्या वाटेवर

MIM ला 98 जागांवर निवडणूक लढवायची होती पण ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे असदुद्दीन ओवेसी यांच्या या पक्षाने वंचित बहुजन आघाडीबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीत MIM ने वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत औरंगाबादमध्ये MIM चे इम्तियाज जलील हे खासदार झाले पण MIM सोबत गेल्यामुळे मुस्लीम मतं वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नाहीत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आणि असादुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या, तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या पण जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे अखेर वंचित बहुजन आघाडीत फूट पडली आहे.

इतर बातम्या - भाजप-सेनेच्या मेगाभरतीमुळे युतीत मोठा ट्विस्ट, असा असेल नवा फॉर्म्युला

VIDEO: काँग्रेस-राष्ट्रवादीला भविष्य नाही; मत वाया घालवू नका, पंकजा मुंडे आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 03:11 PM IST

ताज्या बातम्या